बातम्या

सीपीआरसमोर ५० फूट उंचीवर बगळा मांज्यात अडकला; अग्निशमन दलाने दिले जीवदान!

Egret trapped in kite string 50 feet up near CPR


By nisha patil - 11/9/2026 3:30:30 PM
Share This News:



सीपीआरसमोर ५० फूट उंचीवर बगळा मांज्यात अडकला; अग्निशमन दलाने दिले जीवदान!

 

सीपीआर रुग्णालयासमोरील झाडावर तब्बल ५० फूट उंचीवर पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या बगळ्याची अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत सुरक्षित सुटका केली. मांजाच्या फासात अडकून बगळा झाडावर असहाय अवस्थेत लटकत असल्याचे निदर्शनास आले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. उंच झाडावर अडकलेल्या बगळ्याला खाली उतरवण्यासाठी फायर फायटरच्या बूमचा वापर करण्यात आला. जवानांनी कौशल्याने मांजा कापून बगळ्याला सुखरूप खाली आणले.

सुटका केल्यानंतर जखमी अवस्थेतील बगळ्याला पुढील उपचारासाठी पांजरपोळ येथे बगळे डॉक्टरांच्या ताब्यात देण्यात आले. या रेस्क्यू मोहिमेसाठी MH.09.5383 फायर फायटर आणि MH.09.4806 देवदूत फायर फायटर घटनास्थळी हजर होते.

अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे एका मुक्या जीवाचे प्राण वाचले. पतंग उडवताना धोकादायक मांजाचा वापर टाळावा, तसेच पक्षी आणि इतर जीवांना त्याचा धोका होणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.


सीपीआरसमोर ५० फूट उंचीवर बगळा मांज्यात अडकला; अग्निशमन दलाने दिले जीवदान!
Total Views: 12