बातम्या

विजेचा खेळ खंडोबा बंद करा, पर्यायी विज पुरवठ्याची व्यवस्था करा.आजरा अन्याय निवारण समिती व नागरिकांची मागणी

Electric city


By nisha patil - 5/15/2026 12:36:26 PM
Share This News:



**विजेचा खेळ खंडोबा बंद करा, पर्यायी विज पुरवठ्याची व्यवस्था करा.आजरा अन्याय निवारण समिती व नागरिकांची मागणी

**आजरा(हसन तकीलदार)*:-पाच मिनिटे पाऊस पडला की रात्रभर आणि दिवसभर लाईट गुल होते. वीज देखभालीच्या नावाखाली सोमवारी पूर्ण दिवसभर वीज पुरवठा खंडित केला जातो. वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येबाबत अन्याय निवारण समिती,नगरसेवक,सामाजिक कार्यकर्ते व वीज वितरण अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली.यामध्ये पंधरा दिवसात पर्यायी वीज पुरवठा लाईन देण्याचे आश्वासन वीज अधिकाऱ्यांनी दिली.

   दिनांक 12/05/2026 व 13/05/2026 रोजी सलग दोन दिवस रात्रीच्या वेळी आणि आज दि. 14/05/3026 रोजी दिवसभर वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला जात असलेने नागरिकांच्या . या समस्येबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू असताना सामाजिक सेवा प्रतिष्ठान व अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक परशुराम बामणे (भाऊजी) यांनी पुढाकार घेत दिनांक 14/95/2026 रोजी सकाळी 11:00 वाजता महावितरण कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेण्याचे आवाहन केले.

यानुसार आजरा येथील महावितरण कार्यालयात नागरिक व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी वारंवार वीज खंडित होत असल्याबाबत नगरसेवक बाळ केसरकर व माजी नगरसेवक किरण कांबळे यानी तीव्र नाराजी व्यक्त केली. “पुढील 15 दिवसांत पर्यायी वीज लाईनची व्यवस्था केली नाही तर हजारो नागरिकांसह आंदोलन करून जाब विचारला जाईल,” असा इशारा अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष नगरसेवक परशुराम बामणे यांनी अधिकाऱ्यांना दिला.

सामाजिक कार्यकर्ते नौशाद बुड्डेखान यांनी म्हटले की,रात्रभर वीज नसल्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लहान मुले,वयोवृद्ध नागरिक आणि रुग्ण यांना याचा खूपच त्रास सहन करावा लागत आहे. अशीच गैरसोय होत असेल तर नागरिकांनी जगायचे कसे ? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच प्रकाश सावंत यांनी, “पावसाळ्यापूर्वीच फक्त आजरा शहराचीच वीज वारंवार का बंद होते?” असा सवाल उपस्थित केला. आजरा तालुका वीज बिल वसुलीत प्रथम क्रमांकावर असूनही ग्राहकांना सातत्याने त्रास सहन करावा लागत असल्याची खंतही यावेळी व्यक्त करण्यात आली.ज्याप्रमाणे ग्राहकांनी वेळेत बिले भरून सहकार्य केले तर योग्य सेवा का पुरवली जात नाही असा सवाल सामाजिक कार्यकर्ते शरीफ खेडेकर यांनी विचारला.

बैठकीस महावितरणचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता नागेश बसरकट्टी, सहाय्यक अभियंता कृष्णात कोळी व लाईनमन संतोष डोंगरे उपस्थित होते. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यावेळी 12 वर्षांपूर्वी मलिग्रे येथे पर्यायी फिडिंगसाठी सबस्टेशन उभारण्यात आले होते, मात्र काही कारणांमुळे ते फिडर बंद असल्याची माहिती देण्यात आली.

यावर संबंधित सबस्टेशनची दुरुस्ती करून तसेच तेथून येणाऱ्या वीजवाहिन्यांच्या मार्गावरील झाडांची छाटणी करून पुढील १५ दिवसांत पर्यायी वीज व्यवस्था सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले.

या चर्चेत अन्याय निवारण समिती अध्यक्ष व नगरसेवक परशुराम बामणे (भाऊजी), नगरसेवक असिफ सोनेखान, समिती उपाध्यक्ष गौरव देशपांडे तसेच समिती सदस्य जोतिबा आजगेकर, मिनीन डिसोझा, अतुल पाटील, दिनकर जाधव,मुनीर माणगावकर, सफवान काकतीकर आदींनी भाग घेतला.


विजेचा खेळ खंडोबा बंद करा, पर्यायी विज पुरवठ्याची व्यवस्था करा.आजरा अन्याय निवारण समिती व नागरिकांची मागणी
Total Views: 7