बातम्या
विवेकानंद कॉलेजतर्फे पर्यावरण जनजागृती रॅली
By nisha patil - 9/9/2026 3:26:25 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजतर्फे पर्यावरण जनजागृती रॅली
कोल्हापूर. दि. 09 : निर्माल्य संकलन, प्लास्टिक बंदी तसेच ध्वनिप्रदूषणास प्रतिबंध करण्याबाबत समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने 6 महाराष्ट्र गर्ल्स् बटालियन एन सी सी, विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर यांनी दि. 8 सप्टेंबर रोजी पर्यावरण जनजागृती मोहीम आयोजित केली होती.
या मोहिमेअंतर्गत निर्माल्याचे योग्य संकलन व व्यवस्थापन, प्लास्टिकच्या वापरास प्रतिबंध आणि डॉल्बी/ध्वनिवर्धकाच्या मर्यादित व नियमबद्ध वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. या उपक्रमामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच NCC कॅडेट्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
जनजागृती रॅलीचा प्रारंभ बिंदू चौक येथून करण्यात आला. रॅली बिंदू चौक – शिवाजी पुतळा – भवानी मंडप – बिंदू चौक या मार्गाने काढण्यात आली. रॅलीदरम्यान पर्यावरण संवर्धन, प्लास्टिकमुक्त परिसर, निर्माल्याचे योग्य संकलन आणि ध्वनिप्रदूषणमुक्त समाज याबाबत घोषवाक्ये व संदेशांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली.
या रॅलीमध्ये सीटीओ डॉ. नम्रता नरेवाडीकर, फिजिक्स् विभाग प्रमुख डॉ. संजय लठ्ठे, डॉ गणेश नवाथे, प्रा अविनाश गायकवाड, प्रा. मयुर अंकलगी, प्रा अमेय पाटील, प्रा अनुरथ गोरे, प्रा प्रज्ञा पाटील, श्री प्रशांत पाटील, श्री पी बी हरेर, श्री गणेश माने यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी, NCC कॅडेट्स आणि राजवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनजागृती रॅली प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे आणि 6 महाराष्ट्र गर्ल्स् बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विक्रम नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली होती.
रॅलीला नागरिकांचा तसेच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त आणि उत्साहपूर्ण प्रतिसाद लाभला. या उपक्रमातून पर्यावरणपूरक जीवनशैली, सार्वजनिक स्वच्छता आणि ध्वनिप्रदूषण नियंत्रण याबाबत समाजामध्ये सकारात्मक संदेश पोहोचविण्यात आला. “स्वच्छ परिसर, प्लास्टिकमुक्त समाज आणि ध्वनिप्रदूषणमुक्त पर्यावरण” हा संदेश या मोहिमेतून प्रभावीपणे देण्यात आला.
विवेकानंद कॉलेजतर्फे पर्यावरण जनजागृती रॅली
|