बातम्या
सैनिक टाकळी MIDC ला माजी सैनिक शेतकऱ्यांचा विरोध कायम;
By nisha patil - 4/9/2026 3:21:51 PM
Share This News:
सैनिक टाकळी MIDC ला माजी सैनिक शेतकऱ्यांचा विरोध कायम;
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानंतर प्रांताधिकाऱ्यांकडून गायरान जमिनीची संयुक्त पाहणी
सैनिक टाकळी ..प्रातिनधी आचिन हेरवाडे.सैनिक टाकळी येथे प्रस्तावित असलेल्या औद्योगिक वसाहती (MIDC) ला येथील माजी सैनिक, शेतकऱ्यांनी विरोध दर्शविल्यानंतर 18 ऑगस्ट रोजी उद्योग मंत्रालय मुंबई मध्ये झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार एमआयडीसीची प्रक्रिया स्थगित ठेवन ज्या ग्रामसभेच्या ठरावाच्या आधारे एमआयडीसी मंजुरीची प्रक्रिया केली होती त्या ठरावाची सत्यता पडताळणे व गावाचे एकूण गायरानाची पाहणी करुन सद्यस्थितीचा अहवाल पाठवण्याचा आदेश उद्योग मंत्र्यांनी बैठकीत दिला होता.
त्यांनंतर या प्रकरणाला वेग आला आहे. उद्योगमंत्री सामंत यांच्या आदेशाच्या अनुषंगाने आज सैनिक टाकळी येथे शासकीय पथकाने गट नंबर 1, 1180/1, 1350, 1194, 159, 161, 1180/2, आणि 840/2 या गायरान जमिनीवर प्रांताधिकारी दीपक शिंदेसो व शिरोळ तहसीलदार अनिल कुमार हेळकरसो तलाठी, मंडळ अधिकारी, यांच्या संयुक्त पथकाने स्थळ पाहणी केली. पोलीस प्रशासनाकडून कुरूंदवाडचे पोलीस निरीक्षक शितल कुमार डोइजड हे उपस्थित होते
अधिकाऱ्यांनी वरील गट नंबरच्या गायरान जमिनीची हद्द, सातबारा नोंदी, प्रत्यक्ष वापर आणि पर्यायी जागेची उपलब्धता याबाबत सविस्तर पाहणी केली असता फक्त 5.12 हेक्टर गायरान जमीन गावाला शिल्लक राहते.
एमआयडीसीला जमीन दिल्यास भविष्यात गावाच्या विकासासाठी जमिनीच शिल्लक राहत नाही.
त्यामुळे माजी सैनिक व शेतकऱ्यांनी आपली भूमिका पुन्हा ठामपणे मांडली. "देशसेवा करून आम्ही गावाकडे शेती करतोय, गायरान जमीन ही आमची जीवनरेषा आहे, ती MIDC साठी देऊ नये," अशी मागणी त्यांनी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्याकडे केली. तसा अहवाल उद्योग मंत्रालयाला पाठवावा अशी विनंती केली.
या सर्व पाहणीचा सविस्तर अहवाल आता उद्योग विभागाला पाठवण्यात येणार असून, उद्योगमंत्री उदय सामंत हे अंतिम निर्णय घेणार आहेत.
यावेळी सैनिक टाकळी परिसरातील माजी सैनिक व शेतकरी पुरग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सैनिक टाकळी MIDC ला माजी सैनिक शेतकऱ्यांचा विरोध कायम;
|