बातम्या
शेतकऱ्यांना १ लाखांपेक्षा अधिक प्रोत्साहनपर अनुदान मिळावे-माजी आमदार राजेश पाटील यांची कृषीमंत्र्यांकडे मागणी*
By nisha patil - 8/8/2026 8:31:23 PM
Share This News:
**शेतकऱ्यांना १ लाखांपेक्षा अधिक प्रोत्साहनपर अनुदान मिळावे-माजी आमदार राजेश पाटील यांची कृषीमंत्र्यांकडे मागणी*
*आजरा(हसन तकीलदार)*:- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत नियमितपणे आणि प्रामाणिकपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणारे प्रोत्साहनपर अनुदान ₹50,000 वरून किमान ₹1,00,000 किंवा त्यापेक्षा अधिक करण्यात यावे, अशी मागणी आजरा -चंदगड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजेश पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली.
पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी नियमितपणे आणि प्रामाणिकपणे आपल्या कर्जाची परतफेड करणारा असून कोल्हापूर,सांगली,सातारा जिल्ह्यातील थकीत कर्जाचे प्रमाण तुलनेने कमी आहे. त्यामुळे या जिल्ह्यात प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.अशा शेतकऱ्यांनी वेळेत कर्जफेड करून शासनाच्या आर्थिक शिस्तीला हातभार लावला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रामाणिकपणाचा सन्मान म्हणून प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम वाढवून किमान एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक रुपये करण्यात यावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
यावेळी चंदगड तालुक्यात सध्या जाणवत असलेल्या खतांच्या तुटवड्याचा प्रश्नही माजी आमदार राजेश पाटील यांनी कृषीमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला.खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आवश्यक खतांचा वेळेत व पुरेसा पुरवठा होणे गरजेचे असून, चंदगड तालुक्यातील खतांचा तुटवडा तातडीने दूर करून शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार खत उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी करण्यात आली.यावेळी सभापती विलास नाईक, व्हा. चेअरमन तानाजी गडकरी, एस. एल. पाटील, अनिल सुरुतकर, एस. वाय. पाटील, विनोद पाटील तसेच संबंधित शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना १ लाखांपेक्षा अधिक प्रोत्साहनपर अनुदान मिळावे-माजी आमदार राजेश पाटील यांची कृषीमंत्र्यांकडे मागणी*
|