बातम्या
*रोझरी इंग्लिश हायस्कूल मध्ये 10वीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
By nisha patil - 7/20/2026 11:41:15 AM
Share This News:
*रोझरी इंग्लिश हायस्कूल मध्ये 10वीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
आजरा(हसन तकीलदार )-: रोझरी इंग्लिश हायस्कूल, आजरा येथे शाळेच्या डायमंड जुबिली वर्षानिमित्त इयत्ता दहावीच्या परीक्षेत विशेष यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विल्सन डिसोजा होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्षपद मारियान रॉड्रिक्स यांनी भूषवले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. इयत्ता 10वी चे पाच गुणवंत विद्यार्थी प्रथम राजवर्धन पाटील,द्वितीय रवीत केसरकर ,तृतीय महिन शेख,चतुर्थ प्रियानी गुंजाटे , पाचवी मंजिरी तावडे असून या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना शाळेचे मॅनेजर फादर मेल्विन पायस, प्राचार्य फादर अँथोनी डिसोजा आणि मुख्याध्यापक मनवेल बारदेस्कर यांचे विशेष मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
शिक्षकांच्या अथक परिश्रमामुळेच हे यश शक्य झाले, असे मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले..तसेच या कार्यक्रमास माजी विद्यार्थी संघटनेचे प्रकाश करवालो , दाऊद उर्फ मुन्ना लमतुरे, रुपेश वाळके आदी माजी विद्यार्थी संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. संयोगिता वाळके यांनी केले, तर पारितोषिकांचे वाचन सौ. शैलजा कांबळे यांनी केले. विजय केसरकर यांनी आभार व्यक्त केले.
*रोझरी इंग्लिश हायस्कूल मध्ये 10वीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
|