बातम्या

जिल्हा परिषद शिक्षकपदी निवड झालेल्या मीरा शेवाळे व अक्षदा पोवार यांचा सत्कार

Felicitation of Meera Shewale and Akshada Powar

By nisha patil - 3/9/2026 5:13:29 PM
Share This News:

जिल्हा परिषद शिक्षकपदी निवड झालेल्या मीरा शेवाळे व अक्षदा पोवार यांचा सत्कार

कागल प्रतिनिधी : अजित बोडके शेंडूर : प्रतिनिधी शेंडूर गावातील मीरा अविनाश शेवाळे व अक्षदा पांडुरंग पोवार यांची नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद शिक्षक भरती प्रक्रियेत शिक्षकपदी निवड झाली. त्यांच्या या यशाबद्दल गोकुळचे संचालक माजी बाबासाहेब चौगुले व बयाजी शेळके यांनी दोघींची भेट घेऊन पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या.

गावातील मुलींनी शिक्षण क्षेत्रात मिळविलेल्या या यशाबद्दल आनंद व्यक्त करत, त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या यशामुळे शेंडूर गावाच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली असून, विद्यार्थ्यांसाठी हे प्रेरणादायी यश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

जिल्हा परिषद शिक्षकपदी निवड झालेल्या मीरा शेवाळे व अक्षदा पोवार यांचा सत्कार
Total Views: 18