बातम्या
आंदोलनाचा पाचवा दिवस, हलगीनाद करूनही प्रशासन जागे होत नाही
By nisha patil - 8/22/2026 8:10:14 PM
Share This News:
आंदोलनाचा पाचवा दिवस, हलगीनाद करूनही प्रशासन जागे होत नाही
दोन दिवसात यावर निर्णय झाला नाही तर आंदोलन अधिक तिव्र करणार -कॉ. शिवाजी गुरव*
*आजरा(हसन तकीलदार):-लोकहितासाठी मागील पाच दिवसापासून धरणे व हलगीनाद आंदोलन सुरु आहे. जवळपास एक वर्षापासून उत्तूर बसस्थानकाचे काम बंद असल्याने बसस्थानकाचे बांधकाम सुरु करण्यासाठी निवेदने दिली परंतु प्रशासनाने दखल न घेतल्याने प्रवासी संघटनेने मागील पाच दिवसापासून धरणे व हलगीनाद आंदोलन सुरु केले आहे. भर पावसात लोकहितासाठी आणि गावच्या हितासाठी हे आंदोलन पाच दिवसापासून सुरु आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन जागे केव्हा होणार? या आंदोलनाची दखल कधी घेणार? असे सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहेत.
उत्तूर आणि उत्तूर परिसरातील 40 गवाना मध्यवर्ती ठिकाण असलेले आणि मागील अंदाजे 60 ते 70 वर्षापासून याठिकाणी बस स्थानक आहे. तेव्हा कोणाला त्रास झाला नाही. आताच विरोध का? केवळ राजकीय द्वेषपोटी विकासाला खिळ घालणे योग्य नाही असे प्रवासी संघटनेचे मत आहे. सद्या लहान मुले, वृद्ध, रुग्ण, महिला प्रवासी तसेच विद्यार्थ्यांना ऊन, वारा पावसामध्ये झाडाखाली ताटकळत उभे रहावे लागत आहे. केवळ एखादा कोणी तक्रार करतो आणि काम बंद केले जाते हे कितपत योग्य आहे? असेही काहींचे मत आहे. हे काम पूर्ववत सुरु करावे यासाठी मागील पाच दिवसापासून धरणे व हलगीनाद आंदोलन सुरु आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधीना कधी जाग येणार याकडे जनतेचे व आंदोलनकर्त्यांचे लक्ष लागून आहे. जर दोन दिवसात निर्णय नाही झाला तर यापेक्षाही आंदोलन तिव्र करण्याचा इशारा कॉ. शिवाजी गुरव यांनी दिला आहे. यावेळी महादेव सुतार, रामदास मोरवाडकर, निवृत्ती गजरकर, श्रीमती रोहिणी चौगुले,शिवाजी इंगळे,सुभाष कांबळे आदिजण उपस्थित होते.
आंदोलनाचा पाचवा दिवस, हलगीनाद करूनही प्रशासन जागे होत नाही
|