बातम्या

*अखेर चित्रीधरण पुर्ण भरले..लोकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या

Finally the photo booth was completely filled


By nisha patil - 7/29/2026 7:57:25 PM
Share This News:



*अखेर चित्रीधरण पुर्ण भरले..लोकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या
 

*आजरा(हसन तकीलदार):-यावर्षी जून महिना कोरडा गेला आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून दमदार पावसाला सुरवात झाली. त्यामुळे गत वर्षीपेक्षा यावर्षी चित्री धरण भरण्यासाठी उशिर झाला. अखेर आज दि. 29/07/2026 रोजी दुपारपासून चित्री प्रकल्प पूर्ण भरल्याचे दिसून आले. त्यामुळे गडहिंग्लज आणि आजरा या दोन तालुक्यातील शेतकरी आणि जनतेची लागलेली उत्सुकता पूर्ण झाली.
     

गडहिंग्लज आणि आजरा तालुक्याला वरदान ठरलेला हा प्रकल्प दरवर्षी कधी भरणार याची उत्सुकता लागून गेलेली असते. या प्रकल्पात 1,886 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा होतो. या प्रकल्पावर 5,850 हेक्टर इतके लाभक्षेत्र आहे तर 9,653 हेक्टर इतकी सिंचन क्षमता आहे. आजऱ्यातील 23 गावे आणि गडहिंग्लज मधील 31 गावे अशा 54 गावांना या प्रकल्पाचा फायदा होतो. या धरणाच्या पाण्यावर जलविद्युत निर्मितीही होते. आजरा शहराला याच पाण्याचा पुरवठा केला जातो.
   

श्रावण महिन्याच्या सुरवातीला येथील परिसराचा सुंदर नजारा पाहण्यासाठी निसर्गप्रेमी आवर्जून भेट देतात. प्रकल्पावरून दिसणारे डोंगर,अनेकविध झाडे, झुडपे,आजूबाजूची शेती आणि शेतीमध्ये वाऱ्यासंगे हेलकावे घेणारी पिके अगदी मनाला स्वर्गसुख देऊन जातात. सुसाट वाऱ्याचा शरीराला हेलकावे देणारा स्पर्श, अंगाला स्पर्षणारी थंडी, आजूबाजूला धुक्याचे पांघरूण ओढलेले डोंगर आणि डोंगरावर जणू उतरलेले काळे नभ याचा सुरेख संगम येथे मनाला मोहून टाकतो. श्रावण महिन्याच्या स्वागतासाठी हिरवाशालू नेसून धरणी माता उभी असल्यासारखे वाटते.
   

परंतु काही अतिउत्साही पर्यटक या ठिकाणचे सौंदर्य बिघडवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा अनुभव येत आहे. आमच्या प्रतिनिधीनी याच आठवड्यात प्रत्यक्ष भेट देऊन चित्रीकरण केले तेव्हा प्रकल्प परिसरात दारूच्या आणि बियरच्या बाटल्या फोडून काचा टाकलेल्या आढळल्या. यामुळे येणाऱ्या महिला आणि लहान मुलांना व पर्यटकांना  शारीरिक हानी किंवा इजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मद्यपी तसेच अतिउत्साही पर्यटकांच्यावर निर्बंध घालून काचा प्लास्टिक गोळा करून स्वच्छता करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
*उचंगी प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून पाणी विसर्ग होत आहे


*अखेर चित्रीधरण पुर्ण भरले..लोकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या
Total Views: 376