बातम्या

*रवळनाथ पतसंस्थेत ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते ध्वजारोहण; चेअरमन अभिषेक शिंपी यांचा अनोखा उपक्रम

Flag hoisting at Ravalnath Credit Society by senior members


By nisha patil - 8/16/2026 11:33:49 PM
Share This News:



*रवळनाथ पतसंस्थेत ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते ध्वजारोहण; चेअरमन अभिषेक शिंपी यांचा अनोखा उपक्रम
 

*आजरा(हसन तकीलदार) स्वातंत्र्यदिनाचा राष्ट्रीय उत्सव केवळ ध्वजारोहणापुरता मर्यादित न ठेवता त्याला सामाजिक बांधिलकीची जोड देण्याचा आदर्शवत उपक्रम आजरा येथील श्री रवळनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने जपला आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त संस्थेच्या कार्यालयात ज्येष्ठ सभासद संगम गुंजाटी यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण केले.
 

संस्थेचे चेअरमन अभिषेक शिंपी यांनी एक वेगळी आणि कौतुकास्पद परंपरा सुरू केली आहे. स्वातंत्र्यदिन तसेच प्रजासत्ताक दिनी होणारे ध्वजारोहण स्वतःच्या हस्ते न करता संस्थेतील ज्येष्ठ सभासद, प्रतिष्ठित व्यक्ती, मान्यवर किंवा समाजहितासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या हस्ते करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून या उपक्रमातून राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याची संधी संस्थेला मिळत आहे.
 

ध्वजारोहणाचा मान एखाद्या ज्येष्ठ सभासदाला किंवा समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला देण्यामागे केवळ औपचारिकता नसून समाजातील चांगल्या कार्याची दखल घेणे आणि त्या कार्यातून इतरांना प्रेरणा मिळावी, हा संस्थेचा उद्देश आहे. ज्येष्ठ व्यक्तींचा अनुभव, समाजातील मान्यवरांचे योगदान आणि सामाजिक कार्यकर्त्यांची सेवा नव्या पिढीसमोर यावी, यासाठी हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.
यावेळी ज्येष्ठ सभासद संगम गुंजाटी यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. उपस्थितांनी देशाच्या अखंडता, एकता आणि प्रगतीसाठी योगदान देण्याचा संकल्प केला. सहकार क्षेत्रात आर्थिक व्यवहारांसोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याची गरज आहे. या भूमिकेतून श्री रवळनाथ पतसंस्थेने राष्ट्रीय सणांच्या माध्यमातून ज्येष्ठांचा सन्मान, सामाजिक कार्याची दखल आणि समाजामध्ये राष्ट्रीय भावना जागृत ठेवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्यामुळे संस्थेचा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.
यावेळी संस्थेचे चेअरमन अभिषेक शिंपी, व्हा. चेअरमन समीर गुंजाटी, संचालक मजीद मुराद, युसूफ गवसेकर, विक्रम पटेकर, किरण कांबळे, इब्राहिम इचनाळकर, विलास कुंभार, सुधीर नार्वेकर, सुरेखा फडके, रमेश कारेकर, दिवाकर नलवडे, सदानंद नार्वेकर, अशोक पोवार, राजू परीट, देगा डिसोजा, मलिकार्जुन तेरणी, हुसेन दरवाजकर यांच्यासह संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. ज्येष्ठांचा सन्मान, मान्यवरांच्या कार्याची दखल आणि राष्ट्रीय सणाचा उत्साह या तिन्हींचा सुंदर संगम श्री रवळनाथ पतसंस्थेच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात पाहायला मिळाला.


*रवळनाथ पतसंस्थेत ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते ध्वजारोहण; चेअरमन अभिषेक शिंपी यांचा अनोखा उपक्रम
Total Views: 5