बातम्या
शिवसाम्राज्य तरुण मंडळ आयोजित ध्वजारोहण सोहळा.
By nisha patil - 8/15/2026 2:08:07 PM
Share This News:
शिवसाम्राज्य तरुण मंडळ आयोजित ध्वजारोहण सोहळा.
15ऑगष्ट,भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांच्या बलिदानाचे स्मरण करण्याचा आजचा दिवस. डॉ.कृष्णात साठे.
कागल प्रतिनिधी अजित बोडके कोल्हापूर: भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या शूर वीरांचे स्मरण करण्याचा आजचा दिवस म्हणजेच, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन होय.राष्ट्रभक्ती, सामाजिक जबाबदारी आणि देश प्रगतीच्या भावना रुजवणारा हा राष्ट्रीय उत्सव होय. आपण सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रभक्ती सामाजिक जबाबदारी आणि देशाची प्रगती कशी होईल यासाठी आप आपल्या परीने सर्वतोपरी सहकार्याची भावना बाळगत सामाजिक हित जोपासणे म्हणजे खरा स्वातंत्र्य दिन साजरा केला असे म्हणता येईल असे प्रतिपादन डॉ. कृष्णात साठे यांनी केले. ते शिव साम्राज्य तरुण मंडळ, जिवबानाना जाधव पार्क कोल्हापूर आयोजित स्वातंत्र्य दिन सोहळ्या निमित्त ध्वजारोहण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी प्रमुख उपस्थितीत सुभेदार मेजर मारुतराव पोवार ज्येष्ठ पत्रकार एन.एस. पाटील, अंबाजीराव इंगळे सरकार, एन. डी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
ध्वजारोहण डॉ.कृष्णात साठे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास मंडळाचे आधारस्तंभ श्रीकांत माजगावकर साहेब,भोला यादव,रमेश जाधव,शांताराम बापू पाटील ,मुख्याध्यापक रमेश पाटील, मेजर पोपटराव, एस. आर. पाटील ,दिलीपराव बोगार ,टी.एस.शिरोडकर,विठ्ठल कांबळे, मारुती घारे, सदाशिव गुरव, एम.जी. रेडेकर, विद्या राजीगरे ,प्रियांका बोगार, सरिता जाधव, सीमा चौगले, राजेश्री पावसकर,मीनाक्षी गुरव स्वाती जाधव, अश्विनी तवंदकर ,शांताराम कांबळे, नागेश परीट,राजवीर बोगार, यशराज पावसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्वांना उद्योगपती श्रीकांत माजगावकर यांनी चहा पाणी नाश्त्याची सोय केली होती.एन.डी.पाटील यांनी आभार मानले.
शिवसाम्राज्य तरुण मंडळ आयोजित ध्वजारोहण सोहळा.
|