बातम्या

माझा गट, माझं कुटुंब’ कार्यशाळे क्रमांक 3 फाउंडेशन फार्मर कप 2026 मधील सहभागी स्पर्धक गटातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Foundation 3


By nisha patil - 8/29/2026 1:46:38 PM
Share This News:



*माझा गट, माझं कुटुंब’ कार्यशाळे क्रमांक 3 फाउंडेशन फार्मर कप 2026 मधील सहभागी स्पर्धक गटातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

आजरा(हसन तकीलदार)*: महाराष्ट्र शासन कृषी विभाग, उमेद व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज तहसील कार्यालयाच्या सभागृहात ‘माझा गट, माझं कुटुंब’ या विषयावरील कार्यशाळा क्रमांक 3 चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी समीर माने (तहसीलदार आजरा) उपस्थित होते.

म्हाळसाकांत देसाई (नायब तहसीलदार आजरा), विकास कोले (निवासी नायब तहसीलदार आजरा), अभिजीत सुतार (फिल्ड ऑफिसर,पाणी फाउंडेशन),श्रीमती संजना मदने( फिल्ड ऑफिसर,पाणी फाउंडेशन मेंटर पाणी फाउंडेशन) सौ. मनिषा पाटील (सहायक कृषी अधिकारी, मेंटर पाणी फाउंडेशन) सौ.सोनाली परीट (उमेद ) यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेला शेतकरी गटातील सदस्य व संबंधितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

    कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच अभंग म्हणत उपस्थित मान्यवर व शेतकरी गटांचे स्वागत पाद्यपूजन, आरती, पुष्प वर्षाव करत रवळनाथ प्रसन्न शेतकरी गट इटे मधील महिला सदस्यांनी केली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत रवळनाथ प्रसन्न गटातील महिलांनी तयार केलेल्या पुष्पगुच्छ देऊन केले. तसेच स्वागत गीत सादर करून उपस्थितांचे स्वागत इटे च्या महिलांनी केले.

 तहसीलदार समीर माने यांनी शेतकरी गट अधिक सक्षम करणे, गटातील सदस्यांमध्ये समन्वय व एकजूट वाढविणे, सामूहिक उपक्रमांच्या माध्यमातून शेतीचा विकास साधणे तसेच शाश्वत शेती व ग्रामविकासाला चालना देण्याची आवश्यकता आहे असे सांगितले.

यावेळी सहभागी शेतकऱ्यांना गटाच्या माध्यमातून विविध कृषी उपक्रम राबविणे, उपलब्ध शासकीय योजनांचा लाभ घेणे आणि सामूहिक प्रयत्नांतून शेती अधिक फायदेशीर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात केले. 

माझा गट माझे कुटुंब कार्यशाळेमध्ये अभिजीत सुतार फिल्ड ऑफिसर,पाणी फाउंडेशन आणि श्रीमती संजना मदने फिल्ड ऑफिसर,पाणी फाउंडेशन यांनी डिजिटल व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. 

कार्यशाळे दरम्यान उपस्थितांनी विविध विषयांवर चर्चा करून आपले अनुभव व विचार मांडले. ‘माझा गट, माझं कुटुंब’ या संकल्पनेतून शेतकरी गटांची एकजूट आणि सामूहिक विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

यावेळी रवळनाथ प्रसन्न शेतकरी गट , इटे, राधाकृष्ण शेतकरी गट पारपोली, हरितक्रांती शेतकरी गट हाजगोळी बुद्रुक, माऊली शेतकरी गट हाजगोळी बुद्रुक, जय शिवराय शेतकरी गट सातेवाडी, लकमेश्वर शेतकरी गट गजरगाव, सेंद्रिय घनसाळ शेतकरी गट दाभिल, रेणुका शेतकरी गट दाभिल, रामलिंग शेतकरी गट पारपोली, सह्याद्री शेतकरी गट किटवडे , राधाकृष्ण शेतकरी गट गवसे असे एकूण 11 गटाचे निमंत्रक आणि सदस्य उपस्थित होते. कार्यशाळा मोठ्या उत्साहात व सकारात्मक वातावरणात पार पडली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा पाटील यांनी केले.आभार सोनाली परीट यांनी मानले.


माझा गट, माझं कुटुंब’ कार्यशाळे क्रमांक 3 फाउंडेशन फार्मर कप 2026 मधील सहभागी स्पर्धक गटातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Total Views: 38