बातम्या

महात्मा गांधी रक्तपेढी, कोल्हापूरकडून गणेश उत्सवानिमित्त मोफत रक्तदान शिबिराचे आयोजन

Free blood donation camp organized by Mahatma Gandhi Blood Bank


By nisha patil - 7/9/2026 5:52:45 PM
Share This News:



महात्मा गांधी रक्तपेढी, कोल्हापूरकडून गणेश उत्सवानिमित्त मोफत रक्तदान शिबिराचे आयोजन
 

कोल्हापूर : प्रतिनिधीमहात्मा गांधी रक्तपेढी, कोल्हापूर व कोल्हापूर जिल्हा सुसज्ज बारा शाखा यांच्या वतीने मोफत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू रुग्णांसाठी रक्त उपलब्ध करून देण्याबरोबरच नागरिकांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
 

“जीवन द्या... रक्तदान करा” या संदेशातून नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन करण्यात आले आहे. रक्तदानामुळे एका रक्तदात्याच्या रक्ताने तीन गरजू व्यक्तींचे प्राण वाचण्यास मदत होऊ शकते, त्यामुळे प्रत्येक निरोगी नागरिकाने रक्तदानासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
 

महात्मा गांधी रक्तपेढीच्या माध्यमातून रुग्णांसाठी पूर्णपणे मोफत रक्तसेवा उपलब्ध करून देण्यात येत असून २४ तास सेवा कार्यरत असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या भागात सेवा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे.
रक्तदान शिबिरामध्ये सुरक्षित व वैज्ञानिक पद्धतीने रक्तसंकलन करण्यात येणार आहे. “रक्तदान करा, आरोग्यदायी रहा, समाजसेवा करा” असा संदेश देत नागरिकांनी अधिकाधिक सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

या उपक्रमासाठी संपर्क : अजित जनार्दन बोडके राज – जनसंपर्क अधिकारी : ८०५५८०२८६१.
“रक्तदान करा... जीवन वाचवा... समाज बळकट करा


महात्मा गांधी रक्तपेढी, कोल्हापूरकडून गणेश उत्सवानिमित्त मोफत रक्तदान शिबिराचे आयोजन
Total Views: 44