बातम्या

विवेकानंद कॉलेजमध्ये अनोख्या पद्धतीने फ्रेंडशिप डे साजरा

Friendship Day celebrated in a unique way at Vivekananda College


By nisha patil - 3/8/2026 12:52:28 PM
Share This News:



विवेकानंद कॉलेजमध्ये अनोख्या पद्धतीने फ्रेंडशिप डे साजरा

कोल्हापूर, दि. ३ ऑगस्ट : विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने यावर्षी फ्रेंडशिप डे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. महाविद्यालय परिसरातील विविध झाडांना फ्रेंडशिप बँड बांधून स्वयंसेवकांनी "झाडे हीच आपली खरी मित्र" असल्याची भावना व्यक्त केली.

यावेळी स्वयंसेवकांनी झाडांचे संवर्धन, वृक्षलागवड आणि पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेतली. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि वृक्षतोड यामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय समस्यांवर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाडांशी मैत्री करून त्यांचे जतन व संवर्धन करण्याचा संकल्प केला.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, फ्रेंडशिप डे हा केवळ व्यक्तींमधील मैत्रीचा उत्सव नसून निसर्गाशीही मैत्री दृढ करण्याचा दिवस आहे. झाडे आपल्याला प्राणवायू, सावली, फळे आणि शुद्ध पर्यावरण देतात. त्यामुळे त्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे.

या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ . संदीप पाटील , प्रा.डॉ. राजश्री पाटील  प्रा.डॉ. प्रविण बागडे, प्रा. डॉ. किर्ती कुरणे विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. या अभिनव उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांचे मार्गदर्शन लाभले .परिसरात तसेच उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.


विवेकानंद कॉलेजमध्ये अनोख्या पद्धतीने फ्रेंडशिप डे साजरा
Total Views: 16