बातम्या

उचगावच्या सर्वांगीण विकासासाठी १ कोटींचा निधी देणार : खासदार धनंजय महाडिक

Funds of ₹1 crore to be provided


By nisha patil - 8/25/2026 9:17:03 PM
Share This News:



उचगावच्या सर्वांगीण विकासासाठी १ कोटींचा निधी देणार : खासदार धनंजय महाडिक

उचगाव : करवीर तालुक्यातील उचगावच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक विकास निधीतून १ कोटी रुपयांचा निधी देण्याची ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. उचगावमधील अंतर्गत रस्त्यांसह विविध विकासकामे पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य नामदेव वाईंगडे यांना हा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद सदस्य नामदेव वाईंगडे आणि पंचायत समिती सदस्य तानाजी कांबळे यांच्या स्वनिधीतून १५ लाख रुपये खर्चून उचगावमधील अंतर्गत रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. जय महाराष्ट्र ग्रुप ते क्लासिक ग्रुप तसेच एमटीएम मंगेश गल्ली या रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते झाला.

यावेळी खासदार महाडिक आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील यांचे उचगावमध्ये स्वागत करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत रस्ते कामांचा शुभारंभ करण्यात आला.

स्थानिक विकास निधीतून उचगावमध्ये काँक्रीटचे रस्ते करण्यात येणार असून, त्यामुळे पुढील १५ ते २० वर्षे रस्त्यांचा प्रश्न निर्माण होणार नाही, असे महाडिक यांनी सांगितले. केंद्र, राज्य तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजपची सत्ता असल्याने विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. उचगावचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य तलहा मणेर आणि महालिंग जंगम यांनी विकासकामांसाठी निधीची मागणी केली. ग्रामपंचायत सदस्य रमेश वाईंगडे यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी आणि एन. डी. ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.


उचगावच्या सर्वांगीण विकासासाठी १ कोटींचा निधी देणार : खासदार धनंजय महाडिक
Total Views: 22