बातम्या
कोल्हापूर पाठोपाठ गडहिंग्लज, मुदाळ, इचलकरंजी येथे आंदोलनाच्या तयारीसाठी परिषदा*
By nisha patil - 8/24/2026 3:46:23 PM
Share This News:
**कोल्हापूर येथे होणाऱ्या 7सप्टेंबर 2026रोजी होणाऱ्या राज्यव्यापी आंदोलनाच्या तयारीसाठी शिक्षण हक्क परिषदेची बैठक*
*कोल्हापूर पाठोपाठ गडहिंग्लज, मुदाळ, इचलकरंजी येथे आंदोलनाच्या तयारीसाठी परिषदा*
आजरा(हसन तकीलदार)*केंद्र आणि राज्य सरकारने नवीन शैक्षणिक धोरण आणून शिक्षणाचा बट्ट्याबोळ सुरू केला असून या विरोधात राज्यव्यापी आंदोलन घेण्याचा निर्णय पुणे येथे 16 ऑगस्ट झालेल्या राज्यभरातल्या कार्यकर्त्यांच्या व्यापक परिषदेत घेण्यात आला होता. त्याच्या तयारीसाठी आज कोल्हापुरात पालक विद्यार्थी शिक्षक आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली या बैठकीत 7 सप्टेंबर 2026 रोजी कोल्हापूर येथे शिक्षण परिषद घेण्याचा निर्णय करण्यात आला या पाठोपाठच जिल्ह्यात गडहिंग्लज, मुदाळ आणि इचलकरंजी येथेही परिषदा होणार आहेत.
शाळा वाचवा- शिक्षण वाचवा मंच महाराष्ट्रच्या नेतृत्वाखाली पुणे येथे राज्यव्यापी बैठक झाली या बैठकीत राज्यव्यापी आंदोलन उभा करण्याचा निर्णय करण्यात आला होता त्याचाच भाग म्हणून आज कोल्हापूर येथे पालक शिक्षक विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक झाली.
या बैठकीत नवीन शैक्षणिक धोरणामुळे खेड्यापाड्यातील वाड्या वस्तीवरील व शहरातील सरकारी शाळा बंद पडणार आहेत. आत्ताच अडीच हजार हून अधिक शाळा बंद झालेल्या आहेत. पंधरा हजार शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. भविष्यात या सरकारी शाळांबरोबर अनुदानित माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचा घाट घातला आहे. महाविद्यालयासाठी एक हजार विद्यार्थी संख्येची अट घातली आहे. ग्रामीण भागातील बहुजन कष्टकरी, दलित आदिवासी, भटके विमुक्त, मुस्लिम अल्पसंख्याक गटातील मुले शिकूच नयेत असे षडयंत्र रचले जात आहे. या साऱ्यांच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन उभा राहत असून त्याच्या तयारीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात विभागवार शिक्षण हक्क परिषदा होणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज, मुदाळ, कोल्हापूर आणि इचलकरंजी अशा चार परिषदा होणार आहेत. येत्या 7 सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे पहिली परिषद होणार आहे. त्याचे नियोजन आजच्या बैठकीत करण्यात आले.
बैठकीला शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच महाराष्ट्रचे निमंत्रक कॉ. संपत देसाई कॉ. उदय नारकर, हुमायून मुरसल, कॉम्रेड दिलीप पवार, प्रा. सुनील शिंत्रे, बाबासाहेब देवकर, कॉ.संजय तरडेकर, सुधाकर सावंत, उमेश देसाई, प्रसाद पाटील, राजाराम वरुटे, राजेश वरक, उमेश देसाई, शफीक देसाई, काकासाहेब भोकरे, कृष्णा भारती, व्ही.डी. जाधव, संभाजी बापट, प्रा.यशवंत चव्हाण, प्रा. शांताराम कांबळे, प्रा. प्रकाश मेंटकर, डी.के.बोडके, संजय साठे, राजेंद्र यादव, रेहाना मुरसल, मारुती पाटील, जोतिराम सोरटे, वसंत पाटील, विवेकानंद गोडसे, सुनील भाटवडेकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापूर पाठोपाठ गडहिंग्लज, मुदाळ, इचलकरंजी येथे आंदोलनाच्या तयारीसाठी परिषदा*
|