बातम्या
गडहिंग्लज येथे अ.भा. किसान सभा विभागीय अधिवेशन संपन्न
By nisha patil - 12/4/2026 8:41:22 PM
Share This News:
गडहिंग्लज येथे अ.भा. किसान सभा विभागीय अधिवेशन संपन्न
अधिवेशनाला गडहिंग्लज,आजरा,चंदगड तालुक्यातील प्रमुख कार्यकत्यांची उपस्थिती
आजरा(हसन तकीलदार):-गडहिंग्लज येथे नुकतेच आखिल भारतीय किसान सभेचे विभागीय अधिवेशन संपन्न झाले या अधिवेशनाचे उदघाटन संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून करण्यात आले.यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.कर्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ॲड. दशरथ दळवी हे होते.
यावेळी उद्घाटनपर भाषण करताना प्राचार्य ए. बी. पाटील म्हणाले, लढल्याशिवाय आजपर्यंत शेतकऱ्यांना काही मिळालेले नाही. शेतकऱ्यांच्या मुलांनी संघटित होऊन शेतीमालाच्या हमीभावासाठी व सुधारण्यासाठी किसान सभेत सामील होऊन. संघर्ष करा. दूधउत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढा उभारा तसेच इतर-प्रश्नांसाठी ही शेतकऱ्यांना किसान सभेने संघटित करावे.
अध्यक्षीय भाषणात ॲड. दशरथ दळवी म्हणाले, संघटनेचे वैचारिक बांधणी पक्की करून आधुनिक पद्धतीने संघटन तंत्र वापरून संघटन बळकट करुया. आपली एकजुट हीच यशाची खात्री होय. याभागात किसान सभा जोरदार उभी करुया.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना कामगार नेते मार्क्सवादी पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी कॉ.शिवाजी मगदूम म्हणाले,आता शेतकऱ्यांच्या- शेतमजुरांच्या आणि कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी या तिन्ही तालुक्यातील शेतकरी, कामगार व शेतमजुरांना संघटित करून लाल बावट्याची ताकद राजकीयदृष्टया ही वाढवुया.
भूमिका मांडताना कॉ.संग्राम सावंत म्हणाले, प्रमुख कार्यकर्त्यांनी आता कार्यरत झाले पाहिजे.संघटन वाढविण्यासाठी वैचारिक पातळीवरील कार्यकर्ते उभे करून कृतीशील होऊया.प्रास्ताविकेत जिल्हा सेक्रेटरी ॲड.अमोल नाईक म्हणाले, या अधिवेशनातून आपल्या झालेल्या लढ्याचे व कार्याचे मूल्यमापन होऊन भविष्यात किसान सभा नेटाने उभी करूयात. यासाठी कृती कार्यक्रम घेऊन संघर्षशील होऊया.
यावेळी प्राचार्य ए.बी.पाटील,ॲड. दशरथ दळवी, कॉ. शिवाजी मगदूम,ॲड.अमोल नाईक, कॉ.संग्राम सावंत कॉम्रेड शिवाजी गुरव,संदीप भोगण,शिवाजी गिलबिले, संभाजी मोहिते, लक्ष्मण पाच्छापुरे,समीर खेडेकर, शशिकला देशमुख,कॉ.बाळासाहेब कामते, कॉम्रेड प्रकाश कुंभार, कृष्णा कांबळे,संभाजी कदम, सुरेश पताडे, अनिल सुतार, सुरेखा पाथरवट,रवी भोसले, हनुमंत गुरव यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
आजच्या अधिवेशनात प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करावे व त्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. केंद्र सरकारने किमान दीडपट हमीभावाचा कायदा करावा.वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या पिक व जीवीत नुकसानीसाठी भरीव नुकसान भरपाई विना विलंब मिळावी. वनजमीन कसणाऱ्या शेतकयांना वी जमीन त्यांच्या मालकीची करून द्यावी.कृषी पंपांची वीज बिले देखील माफ व्हावीत. शेतीसाठी सलग ८ ते १० तास वीज पुरवठा करावा.काजू खरेदी केंद्र व प्रक्रिया उद्योगासाठी शासनाने पुढाकार घ्यावा-
आजरा घनसाळ तांदुळ याला जी. आय. मानांकन आहे. त्याला शासकीय पातळीवर मदत मिळावी.
देवस्थान इनाम खालसा करून त्या जमिनी कसणाऱ्या शेतकयांच्या नावे करा. तसेच कायदेशीररित्या खंड निश्चिती करून त्याप्रमाणे खंड भरून घ्यावा.
उस व सोयाबीन यांना योग्य हमीभाव मिळावा.सरकारी जमिनीवरील शासनाच्या धोरणानुसार सन-२०११ पूर्वीची सरकारी जमिनीवरीले राहती घरे नियमानुकुल करणार.आजरा तालुक्यातील देवर्डे गावातील गावगणवाढ प्रक्रियेतील दप्तर दिरंगाई संपवून देवर्डे गावगणवाढ प्रक्रिया ताबडतोब पूर्ण करणार.महिलांचा शेत जमिनीतील अधिकार वाढवा व शासन स्तरावर पाठपुरावा करुन महिला शेतक-यांची संख्या वाढवा. याकरिता जागृती व संघर्ष करण्याचा निर्धार.महाराष्ट्र शासनाने नागपुर-गोवा शक्तीपीठ महामार्ग हा अनावश्यक महामार्ग कायमस्वरूपी नामंजूर करावा. यासाठी तीव्र लोकआंदोलन उभे करणार.शंकराचार्य करवीर पीठाच्या जमिनी कसणाऱ्या शेतक-यांच्या नावे करा.
असे एकूण 14 ठरावाचे वाचन कॉ शिवाजी गुरव,, शशिकला देशमुख, संदीप भोगण, संभाजी मोहिते, लक्ष्मण पाच्छापुरे, महादेव कांबळे,रवि भोसले, सचिन लोहार, रामा कांबळे,विजय मळेकर, भगवान सूर्यवंशी, सुरेखा पाथरवट यांनी वाचन केले.यावेळी अधिवेशनात विभागीय कमिटीची निवड करण्यात आली.विभागीय अध्यक्ष कॉम्रेड संग्राम सावंत, सेक्रेटरी संभाजी मोहिते, उपाध्यक्ष संदीप भोगण, कॉम्रेड शिवाजी गुरव खजिनदार शिवाजी गिलबिले यांच्या सह 21 जणांची आजरा-चंदगड- गडहिंग्लज तालुकाची विभागीय कमिटीची अधिवेशनात एकमताने लोकशाहीने निवड आली.आभार कॉ. शिवाजी गुरव यांनी मानले.
गडहिंग्लज येथे अ.भा. किसान सभा विभागीय अधिवेशन संपन्न
|