खेळ

गौतम गंभीरच्या "ट्वीटने" माजवली खळबळ

Gautam Gambhir's


By surekha -
Share This News:गौतम गंभीरच्या "ट्वीटने" माजवली खळबळ
लखनौ सुपर जायंट्सचा मेंटर गौतम गंभीर याच्या ट्वीटने सोशल मीडियात खळबळ माजवली आहे. आरसीबीच्या विराट कोहलीबरोबर झालेल्या बाचाबाचीनंतर गौतम गंभीर याने केलेले हे ट्वीट चर्चेचा विषय आहे. एकीकडे विराट कोहली याची बाजू घेत गौतम गंभीर याच्यावर निशाणा साधला होता.  गौतम गंभीर याच्यावर गंभीर टीका केली होती. यावरुनच गौतम गंभीर याने ट्वीट करत निशाणा साधला आहे. यामध्ये गौतम गंभीर याने कोणाचेही, कुठेही नाव घेतले नाही. पण सोशल मीडियावर लोकांनी तो व्हिडीओ पोस्ट केला आहे.  गौतम गंभीर याच्या ट्वीटची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. गौतम गंभीर याने आपल्या ट्वीटमध्ये कुणाचेही नाव घेतले नाही. पण जो मजकूर लिहालाय त्यावरन क्रिकेट चाहत्यांना गंभीरला काय आणि कुणाला म्हणायचे याचा अंदाज लावला आहे. गौतम गंभीर याने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की,  ' दबाव असल्याचे सांगत ज्या व्यक्तीने दिल्ली क्रिकेट सोडून पळ काढला, आता तोच व्यक्ती क्रिकेटबाबत पैसे घेऊन चिंता व्यक्त करत आहे. हाच कलयुग आहे.. जेथे पळपुटे आपली अदालत चालवत आहे'


Gautam Gambhir's "Tweet" created a stir