बातम्या
घोटगेवाडी कॉजवेवरील दुर्घटना; 25 वर्षीय युवकासह 8 वर्षीय बालकाचा समावेश
By nisha patil - 8/19/2026 2:02:24 PM
Share This News:
**तिलारी नदीत वाहून गेलेल्या दोघांपैकी 8 वर्षीय बालकाचा शोध*
*घोटगेवाडी कॉजवेवरील दुर्घटना; 25 वर्षीय युवकासह 8 वर्षीय बालकाचा समावेश*
**आजरा(हसन तकीलदार)**:-घोटगेवाडी येथे तिलारी नदीवरील पूल पार करण्याच्या प्रयत्नात 25 वर्षीय परप्रांतीय युवक आणि 8 वर्षीय शाळकरी मुलगा पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, दोघांचाही शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. सह्याद्री ऍडव्हेन्चर अँड रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले होते. यामध्ये 8 वर्षीय शाळकरी मुलाला शोधण्यात रेस्क्यू टीमला यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घोटगेवाडी येथील तिलारी नदीवरील छत्तीसगड येथील 25 वर्षीय परप्रांतीय युवक व 8 वर्षीय मुलगा पूल पार करत होते.
मात्र, नदीच्या पाण्याचा प्रवाह
प्रचंड वेगवान असल्याने दोघेही पाण्यात वाहून गेले. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
रेगन दिलीप बडे (वय वर्षे 8) व अनुरंजन किसकोटा (वय वर्षे 25) अशी त्यांची नावे असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने हालचाली करून तिलारी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी करण्यात आले असून, वाहून गेलेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम हाती घेण्यात आली होती नदीपात्र आणि परिसरात
या दुर्घटनेबाबत कोनाळचे उपसरपंच रत्नकांत करें यांनी सविस्तर माहिती दिली.
दरम्यान, नदीत वाहून गेलेल्या दोघांचा लवकरात लवकर शोध घेण्यासाठी प्रशासनाने तातडीने व्यापक शोधमोहीम राबवावी, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आली त्यानुसार सह्याद्री रेस्क्यू टीमला बोलावण्यात आले. शोधमोहीम सुरु झाली आणि वाहून गेलेल्या व्यक्तीपैकी 8 वर्षीय बालकाचा शोध घेण्यात सह्याद्री रेस्क्यू टीमला यश आले आहे.
**सह्याद्री ऍडव्हेन्चर अँड रेस्क्यू टीमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आंबोली आणि आंबोली परिसरात कोठेही घटना घडते त्या ठिकाणी ही टीम पोहचते आणि मृत बेपत्ता व्यक्तींना शोधाण्याची मोहीम फत्ते करते. उन, वारा, पाऊस अगदी प्रतिकूल परिस्थितीतही या टीमच्या सदस्यांचे कार्य हे उल्लेखनीय आहे.या शोधमोहिमेत बाबल अल्मेडा, मायकल डिसोझा, उत्तम नार्वेकर, संतान अल्मेडा, लोरन्स अल्मेडा, राकेश अमृस्कर, अजित नार्वेकर, प्रथमेश गावडे, गुरु सावंत, दाजी माळकर, सर्वेश नाईक यांनी भाग घेतला तर स्वप्नील निंबाळकर आणि दत्ताराम देसाई यांनी शोध मोहिमेसाठी बचाव बोटीचे आयोजन केले. अशी माहिती सह्याद्री ऍडव्हेंचर अँड रेस्क्यू टीमचे सदस्य सुजित चुलीयन यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली*.
घोटगेवाडी कॉजवेवरील दुर्घटना; 25 वर्षीय युवकासह 8 वर्षीय बालकाचा समावेश
|