बातम्या
गोकुळच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला!
By nisha patil - 11/8/2026 11:28:16 PM
Share This News:
गोकुळच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला!
सर्वोच्च न्यायालयाने गोकुळसह संबंधित निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १० ऑक्टोबर २०२६ची अंतिम डेडलाईन दिल्यानंतर आता गोकुळच्या निवडणुकीला वेग आला आहे.
उद्या, १२ ऑगस्टला गोकुळची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
सकाळी ११ वाजता गोकुळच्या नोटीस बोर्डावर आणि जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ही यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
या प्रारूप मतदार यादीवर १२ ते २१ ऑगस्टपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत.
यानंतर प्राप्त हरकतींवर ३१ ऑगस्टपर्यंत निर्णय घेतला जाणार असून, ४ सप्टेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १० ऑक्टोबरपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
त्यामुळे आता गोकुळच्या सत्तासंघर्षाला चांगलाच वेग येणार आहे.
कोणाचे नाव मतदार यादीत राहणार? कोणाचे नाव वगळले जाणार? हरकती कोण दाखल करणार? आणि अंतिम मतदार यादीत कोणाला धक्का बसणार?
या सर्व प्रश्नांची उत्तरे आता पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहेत.
गोकुळच्या निवडणुकीचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे!
गोकुळच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला!
|