बातम्या
श्री सेवा गणेशोत्सव मंडळाच्या गणेशोत्सवाची दिमाखदार सुरुवात; मंडप पूजन व ॲक्रेलिक बोर्डचे उत्साहात उद्घाटन.....
By nisha patil - 3/9/2026 11:32:21 PM
Share This News:
श्री सेवा गणेशोत्सव मंडळाच्या गणेशोत्सवाची दिमाखदार सुरुवात; मंडप पूजन व ॲक्रेलिक बोर्डचे उत्साहात उद्घाटन.....
दत्तवाड प्रातिनिधि. आचिन हेरवाडे: श्री सेवा गणेशोत्सव मंडळ, दत्तवाड यांच्या वतीने गणेशोत्सव २०२६ ची दिमाखदार सुरुवात गुरुवारी (दि. ३) सायंकाळी ७ वाजता बसव मंडप येथे भक्तिमय वातावरणात झाली. मंडप पूजनासह आकर्षक ॲक्रेलिक बोर्डच्या उद्घाटन सोहळ्याने परिसरात गणेशोत्सवाचा उत्साह संचारला.
यावेळी श्री. प्रभाकर पाटील व सौ. साविता पाटील यांच्या शुभहस्ते गणेशमूर्तीच्या प्रतिमेचे पूजन व मंडप पूजन विधिवत करण्यात आले. पूजनानंतर उपस्थित गणेशभक्तांनी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला.
या सोहळ्यास मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य, तसेच गल्लीतील गणेशभक्त, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.एकजुटीची परंपरा आणि भक्तीचा उत्साह जपत यंदाचा गणेशोत्सव अधिक जल्लोषात साजरा करण्याचा निर्धार यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. संपूर्ण सोहळा उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व भक्तिमय वातावरणात मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
श्री सेवा गणेशोत्सव मंडळाच्या गणेशोत्सवाची दिमाखदार सुरुवात; मंडप पूजन व ॲक्रेलिक बोर्डचे उत्साहात उद्घाटन.....
|