बातम्या

सिद्धनेर्लीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचा भव्य उद्घाटन समारंभ 

Grand inauguration ceremony of the new Indian National


By nisha patil - 8/17/2026 3:49:02 PM
Share This News:



सिद्धनेर्लीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचा भव्य उद्घाटन समारंभ 

काँग्रेसची मोर्चेबांधणी सुरू, युवक काँग्रेस मोठ्या प्रमाणात सक्रिय - राहुल घराळ

कागल प्रतिनिधी अजित बोडके सिद्धनेर्ली / प्रतिनिधी : कागल तालुक्यात काँग्रेस पक्षाची मोर्चेबांधणी जोरात सुरू असून, सिद्धनेर्ली येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या नवीन कार्यालयाचा भव्य उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला. नदीकिनारा, सिद्धनेर्ली येथे हे कार्यालय सुरू.हा उद्घाटन समारंभ रविवार, दि. 16 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता आयोजित केला आहे.

कागल तालुका भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दिवंगत नेते स्वातंत्र्यसैनिक दौलतराव निकम साहेब, लोकनेते स्व. सदाशिवराव मंडलिक साहेब व सहकारमहर्षी स्व. विक्रमसिंहजी घाटगे साहेब यांच्या प्रतिमात्मक बालचमूंच्या शुभहस्ते या कार्यालयाचे उद्घाटन झाले 

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. सागर कोंडेकर. तालुका अध्यक्ष ॲड. दयानंद पाटील, मार्गदर्शक ईगल प्रभावळकर, युवा काँग्रेस अध्यक्ष अमर चौगुले, तालुका किसान अध्यक्ष रणजित पाटील, महिला तालुका अध्यक्ष दिपाली आवळे हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे निमंत्रक कागल तालुका सरचिटणीस राहुल घराळ यांनी केले.

यावेळी बोलताना राहुल घराळ म्हणाले, "कागल तालुक्यात काँग्रेस पक्षाची मोर्चेबांधणी चालू असून, विशेषतः युवक काँग्रेस मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली आहे. सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी हे नवीन कार्यालय महत्त्वाचे ठरणार आहे.
 या कार्यक्रमाला उपस्थित अनिल संकपाळ प्रवीण माळी प्रवीण घराळ सनी पाटील धनाजी फरतारे सुधीर घराळ दशरथ घराळ प्रवीण माळी सोन्या पारटे रावसाहेब घराळ विनायक घराळ विशाल तिराळे अनिल मुळीक बीपी पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
अभार दयानंद पाटील यांनी मांडले.

 


सिद्धनेर्लीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचा भव्य उद्घाटन समारंभ 
Total Views: 9