बातम्या

प्रतिपंढरपूर नंदवाळ येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखेचा दिमाखात शुभारंभ

Grand inauguration of the Swabhimani Shetkari Sanghatana


By nisha patil - 8/16/2026 11:29:55 PM
Share This News:



प्रतिपंढरपूर नंदवाळ येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखेचा दिमाखात शुभारंभ

 कागल प्रतिनिधी अजित बोडके नंदवाळ, ता. करवीर : कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ (ता. करवीर) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नूतन शाखेचे उद्घाटन उत्साहात पार पडले.

शेतकरी चळवळीमध्ये आणि विविध आंदोलनांमध्ये करवीर तालुका नेहमीच अग्रभागी राहिला आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी उत्स्फूर्तपणे आंदोलने होत असतात. याच लढाऊ वृत्तीमुळे शेतमालाला चांगला दर मिळणे आणि शेतकऱ्यांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळणे शक्य झाले आहे.

या पार्श्वभूमीवर संघटनेची ताकद अधिक वाढवण्यासाठी नंदवाळ येथे नवीन शाखा सुरू करण्यात आली आहे. शाखाध्यक्ष अरुण पाटील व ग्रामस्थांच्या वतीने या कार्यक्रमाचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते.

या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार, डॉ. बाळासाहेब पाटील, बाजीराव पाटील, विक्रम पाटील, नितेश कोगनोळे यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

या शाखेच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न केले जातील, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.

 


प्रतिपंढरपूर नंदवाळ येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखेचा दिमाखात शुभारंभ
Total Views: 5