बातम्या
कागल काँग्रेसतर्फे आम. सतेज पाटील यांचे भव्य स्वागत....
By nisha patil - 9/9/2026 12:40:17 AM
Share This News:
कागल काँग्रेसतर्फे आम. सतेज पाटील यांचे भव्य स्वागत....
कागल: कागल प्रतिनिधी अजित बोडके गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील ठराव धारकांच्या भेटी दौऱ्या निमित्त काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांचे कागल तालुका काँग्रेसतर्फे शिवतीर्थ मुरगुड येथे पक्षाच्या स्वागत फलकासमोर ढोल ताशा, फटाक्यासह जय शिवाजी जय भवानी गर्जनात हार्दिक स्वागत केले ,
मुरगुड शहर काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष आमदार बंटी पाटील साहेब यांचा सत्कार सौ.ज्योती सूरज सातवेकर यांच्या हस्ते गोळुळचे मा. चेअरमन रणजीतसिंह पाटील, प्रदेश सदस्य विनायक घोरपडे, तालुकाध्यक्ष अँड दयानंद पाटील- नंद्याळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी किसान काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सागर कोंडेकर, तालुका काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी ईगल प्रभावळकर, दिपाली आवळे, रणजीत खतकर, अमर चौगुले, रणजीत पाटील, राजेंद्र शिंदे, दीपक शेणवी, राहुल घराळ, सिद्धार्थ कांबळे , विश्वानाथ कोरे, बाबुराव पाटील, युवराज पाटील, सुरज सातवेकर या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीसह काँग्रेस प्रेमी कार्यकर्ते हजर होते. कार्यक्रमाचे आभार सोशल मीडिया अध्यक्ष सुशांत पाटील यांनी केले.
यावेळी आमदार पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेत कु.आराध्या सु. पाटील, कु.श्रद्धा सुहास पाटील यांचा प्रथम क्रमाक बद्दल सत्कार करण्यात आला.
कागल तालुक्यातील सांगाव, कागल, सिद्धनेर्ली, गोरंबे,भडगाव, कुरणी, आलाबाद, कापशी, लिंगनूर, चिखली, बानगे, निढोरी, बिद्री या गावामध्ये दौऱ्या मार्गावर फटाक्या- घोषणा, ओवाळणीसह उस्फुर्त स्वागत केले.
या दौऱ्या दरम्यान प्रकाश सावंत, आनंदा घोरपडे, प्रमोद वाडकर, प्रकाश पार्टे, प्रवीण माळी, प्रा. तुकाराम पाटील, विश्वनाथ कटकर ,प्रकाश चौगुले, अवधूत गायकवाड , ओंकार शेळके, विजय गायकवाड,सचिन गायकवाड, राघव आसबे , रघुनाथ सावंत, बाळासाहेब गायकवाड, अनिल सकपाळ ,संदीप चौगुले , शरद वास्कर, आशुतोष कांबळे,गणेश पाटील , महाविर आळते ,अमर शिंदे, सावता कांबळे, अमित पाटील (बिद्री) महादेव कामते, अलाबाद सरपंच लता बाबुराव कांबळे उपस्थित होते.
कागल काँग्रेसतर्फे आम. सतेज पाटील यांचे भव्य स्वागत....
|