बातम्या
*देवर्डे ता. आजरा येथील सैन्य भरतीत यश संपादन केलेल्या सुपुत्रांचे जोरदार स्वागत
By nisha patil - 11/8/2026 2:41:49 PM
Share This News:
*देवर्डे ता. आजरा येथील सैन्य भरतीत यश संपादन केलेल्या सुपुत्रांचे जोरदार स्वागत
*आजरा(हसन तकीलदार):- देवर्डे ता. आजरा येथील सुपुत्र पवन मनोहर चाळके आणि आकाश प्रकाश चाळके या दोघा भावानी अग्निवीरमध्ये भरती होऊन भारतीय सैन्यदलातील कठोर प्रशिक्षण पूर्ण करून आल्यानंतर देवर्डे ग्रामस्थांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.
ग्रामदेवतेचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर पारंपारिक वाद्यांच्या गजरात त्यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. एखाद्या सणासुदीसारखे आनंदी आणि उत्साही वातावरण गावात तयार झाले होते. यावेळी त्यांच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. चाळके कुटुंबिय एकत्र कुटुंब पद्धतीने सर्वजण एकत्र राहतात. यावेळी आजी माजी सैनिक, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*देवर्डे ता. आजरा येथील सैन्य भरतीत यश संपादन केलेल्या सुपुत्रांचे जोरदार स्वागत
|