बातम्या
*आजरा महाविद्यालयातील व्यावसायिक विभागाच्या विद्यार्थ्यांची शिक्षकांना गुरुवंदना
By nisha patil - 7/29/2026 7:56:01 PM
Share This News:
*शिक्षकांनी दिलेल्या संस्कारामुळेच येणाऱ्या संकटावर मात करण्याची ताकद निर्माण होते
*आजरा महाविद्यालयातील व्यावसायिक विभागाच्या विद्यार्थ्यांची शिक्षकांना गुरुवंदना
आजरा(हसन तकीलदार)-: गुरुर ब्रम्हा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा...गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा आजरा महाविद्यालयातील व्यावसायिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा वेगळ्या पद्धतीने साजरी करून आपल्या शिक्षकांना गुरुवंदना दिली. गुरुंनी केलेल्या संस्कारामुळे आपण आयुष्यात येणाऱ्या सर्व संकटावर निश्चितपणे मात करू शकतो असा आत्मविश्वास स्वयंपूर्णपणे घेतलेल्या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांमध्ये दिसून आला.
विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना फुलांची उधळण करीत व औक्षण करून कार्यक्रमाच्या ठिकाणी आणले. स्वागत व प्रास्ताविक सिद्धी जाधव यांनी केले. सर्व शिक्षकांना गुलाब फूल व भेटवस्तू देऊन त्यांचे स्वागत केले. भारतीय संस्कृतीत गुरूला ईश्वराचे स्थान दिले आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात आई वडील हे पहिले गुरू त्यानंतर आपले शिक्षक गुरु आहेत. गुरु आपल्याला अज्ञानातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात. गुरुंनी केलेल्या संस्कारामुळे आपण आयुष्यात येणाऱ्या सर्व अडचणीवर निश्चितपणे मात करू शकतो. उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा देत गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्या गुरूंनी दिलेले ज्ञान आमच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीत आम्हाला सतत मार्गदर्शन करत राहो. आमची मने आणि आत्मा यांचे संगोपन करण्यासाठी तुम्ही केलेल्या अनेक वर्षांच्या निःस्वार्थ सेवेबद्दल आम्ही तुमचे मनःपूर्वक आभार मानतो असे मनोगतातून ऋतुजा नाईक, हर्षदा कांबळे, गौरी बागडी, मानस दळवी, श्रेयश डांगरे, साक्षी करमळकर या विद्यार्थ्यांनी मनोगतातून शिक्षकांबद्दल ऋण व्यक्त केले.
मुलांचे शिक्षकांबद्दल असलेले प्रेम हेच आमचे सुख, समाधान व आम्हाला मिळालेला पुरस्कार आहे. विद्यार्थ्यांनी आई-वडिल व शिक्षकांचे नामस्मरण, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांना आयुष्यात काहीही कमी पडणार नाही असे पर्यवेक्षक मनोजकुमार पाटील, सदाशिव मोरे,संदीप देसाई, नेहा पेडणेकर, सुषमा नलवडे यांनी मनोगतातून व्यक्त केले.शिक्षकांना आनंदी जीवन जगण्यासाठी कार्यक्रमानंतर हास्यविनोदी असणारे फनी गेम्स घेण्यात आले. कार्यक्रमास शिक्षक गिरीश कुरुणकर, पल्लवी नार्वेकर, तेजस्विनी जाधव, शिवाजी कांबळे यासह विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन साक्षी मराठे तर आभार रितू जाधव हिने मानले.
*आजरा महाविद्यालयातील व्यावसायिक विभागाच्या विद्यार्थ्यांची शिक्षकांना गुरुवंदना
|