बातम्या

हाजगोळी खुर्द ता. आजरा येथील ग्रामपंचायत कार्यालय अखेर सील*

Hajgoli


By nisha patil - 8/19/2026 11:40:27 PM
Share This News:



**तारा न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट*

**हाजगोळी खुर्द ता. आजरा येथील ग्रामपंचायत कार्यालय अखेर सील*

**आजरा(हसन तकीलदार)*:-हाजगोळी खुर्द गावचे ग्रामसेवक यांच्यावर ग्रामपंचायत सदस्य तसेच जागरूक ग्रामस्थांमार्फत अनेक गंभीर आरोप करीत त्यांची चौकशी होऊन योग्य ती कारवाई व्हावी तसेच दोषी आढळलेस त्यांचे निलंबन व्हावे असे निवेदन गटविकास अधिकारी, आजरा तहसीलदार, तिन्ही लोकप्रतिनिधी तसेच संबंधित विभागाना देण्यात आले होते.

याबाबत तारा न्यूजने सविस्तर बातमी प्रसिद्ध केली होती. निवेदनाचा विचार करून तसेच बातमीचा इम्पॅक्ट म्हणून गटविकास अधिकारी यांनी अखेर हाजगोळी खुर्द येथील ग्रामपंचायत कार्यालय सील करण्याचे आदेश दिले असल्याचे समजते. त्यानुसार हाजगोळी खुर्दच्या ग्रामपंचायत कार्यालयाला आज दि. 19/08/2026 रोजी सील करण्यात आले आहे.

     हाजगोळी खुर्द गावचे ग्रामसेवक एस. के. येळणे यांचा कारभार सदस्यांना विश्वासात न घेता चाललेला असतो. सदस्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारल्यास त्याची उद्धट उत्तरे देतात. ग्रामसभेच्या नोटीसा न देणे, ग्रामसभा न लावणे. आपण स्वतः साडेसात लाख रुपये खर्च करून गावाला मंत्रालयातून कामे मंजूर करून आणलेली आहेत असे बेजबाबदारपणाचे वक्तव्य केल्याने त्यांना आता ते भोवण्याची शक्यता वाटत आहे. आमच्या चॅनेलची बातमी प्रसारित होताच सुळेरान परिसरातील एका ग्रामस्थाने आमच्या प्रतिनिधिशी संपर्क साधून सुळेरान ग्रामपंचायतीतही मोठा भ्रष्टाचार केला असल्याचे सांगितले. याबाबत पुणे आयुक्तालयात सुनावणी सुरु असल्याचेही सांगण्यात आले. ऑफिस सील करायच्या अगोदर सकाळी लवकर शिक्के मारण्याचे काम ग्रामसेवक करीत होते असेही तक्रारदारांनी सांगितले. त्याचा व्हिडीओ ही आपल्याकडे असल्याचे सांगण्यात येत आहे.


हाजगोळी खुर्द ता. आजरा येथील ग्रामपंचायत कार्यालय अखेर सील*
Total Views: 179