बातम्या

हणमंतवाडी सरपंचपदी तानाजी नरके बिनविरोध

Hanamantwadi Sarpanch Tanaji Narake unopposed


By nisha patil - 2/25/2024 1:40:02 PM
Share This News:हणमंतवाडी सरपंचपदी तानाजी नरके बिनविरोध

सासरे सरपंच, सुन उपसरपंच जिल्ह्यात पहिली घटना

हणमंतवाडी चा सर्वांगीण विकास करणार - सरपंच तानाजी नरके

प्रतिनिधी  पांडुरंग फिरींगे करवीर - हनुमंतवाडी सरपंच पदी चंद्रदीप नरके गटाच्या तानाजी नरके यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपसरपंचपदी निता नरके यांची निवड झाली आहे.हणमंतवाडी तालुका करवीर येथील सरपंच पदी नरके गटाच्या तानाजी धोंडीराम नरके यांची बिनविरोध निवड मंडल अधिकारी नेजकर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.

हणमंतवाडी चं वेगळपण..।

पंचगंगा नदीच्या काठावर हणमंतवाडी गाव वसले असून हनुमान,बिरदेव,आदी देवाच्या साक्षीने सारा गाव आनंदात आहे.हणमंतवाडी येथे चार वर्षांपूर्वी शिणगारे पती पत्नी सरपंच, उपसरपंच म्हणून होते. तर आज सासरा सरपंच व सुन उपसरपंच निवड झाली आहे. यामुळे जिल्ह्यात पहिली निवड एका घरातील व नात्यात झाली आहे. याची परिसरात चांगली चर्चा सुरू झाली आहे.

यावेळी
 माजी सरपंच उद्योगपती संजय जाधव, संग्राम भापकर, कविता जाधव, संगीता शिनगारे, समृद्धी पाटील,  संजय शिंदे, सविता तिबिले,अमित पाटील, कविता शिंदे आदी सदस्य तर सरदार नरके, दिलीप खिलारी, शिवाजी नरके, संभाजी नरके, बाबुराव नरके, राजेंद्र नरके, सुनील पाटील, विष्णू नरके, संजय नरके, संदीप भापकर, सर्जेराव शिपुगडे, लक्ष्मण जाधव, विष्णू जाधव, शिवाजी कामत, अण्णासो पाटील, मोहन भापकर, बाबुराव धनगर आदीह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवड होताच नरके समर्थकांनी भव्य मिरवणूकी काढण्यात आली.


हणमंतवाडी सरपंचपदी तानाजी नरके बिनविरोध