बातम्या
हायमास्ट सोलर लॅम्प अनुसूचितजाती व नवबौद्ध वस्तीतच बसवा-बहुजन मुक्ती पार्टीचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन*
By nisha patil - 8/27/2026 10:20:33 PM
Share This News:
**हायमास्ट सोलर लॅम्प अनुसूचितजाती व नवबौद्ध वस्तीतच बसवा-बहुजन मुक्ती पार्टीचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन*
**आजरा(हसन तकीलदार)*:-
आज दिनांक 27ऑगस्ट 2026 रोजी बहुजन मुक्ती पार्टीच्या*वतीने आजरा गटविकास अधिकारी यांना हायमास्ट सोलार लॅम्प योग्य त्या ठिकाणी बसवण्याच्या कार्यवाही संदर्भात निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की,आजरा तालुक्यातील ४१ गावांत बसवण्यात येत असलेले हायमास्ट सोलार लॅम्प अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीतच बसवण्यात यावे. काही गावातील नागरिकांच्या तक्रारी वरून समाज कल्याणकडून आलेला हा निधी इतर समाजात वळवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना मिळणारा हा निधी इतर ठिकाणी वळवून काही राजकीय पुढारी व प्रशासकीय अधिकारी जाणूनबुजून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे तसे पाहता हा निधी त्या समाजाच्या १५% लोकसंख्येच्या प्रमाणात विकास कामांसाठी येतो राहिलेला इतर ८५% निधी हा इतर समाजासाठी विविध योजनांच्या माध्यमातून येतो तरीदेखील अशा प्रकारची चूक करून वर्षानुवर्ष विकासापासून दूर राहिलेल्या समाजाला त्यांच्या हक्क अधिकारांपासून दूर ठेऊन त्या समाजावर एक प्रकारे अन्याय करण्याचे काम स्थानिक राजकीय पुढारी व प्रशासकीय अधिकारी यांच्या वतीने होत असल्याचे निदर्शनास येत आहे.जर प्रशासनाने यात लवकरात लवकर लक्ष घातले नाही तर येणाऱ्या काळात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभा करण्याचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी डॉ.उल्हास त्रिरत्ने (प. महाराष्ट्र प्रभारी बहुजन मुक्ती पार्टी), डॉ.सुदाम हरेर(प्रभारी, राधानगरी विधानसभा मतदारसंघ), दशरथ सोनुले (सचिव, आजरा तालुका), गौतम मोरे (प्रचारक, बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क), राजेंद्र कांबळे, आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
हायमास्ट सोलर लॅम्प अनुसूचितजाती व नवबौद्ध वस्तीतच बसवा-बहुजन मुक्ती पार्टीचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन*
|