बातम्या
*कर्जमाफी संदर्भात तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या व्यवस्थापकांची बैठक घ्या
By nisha patil - 7/8/2026 3:51:09 PM
Share This News:
*कर्जमाफी संदर्भात तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या व्यवस्थापकांची बैठक घ्या
आजरा तहसील कार्यालयास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे निवेदन
*आजरा(हसन तकीलदार):-सद्या सरकारकडून शेतकऱ्यांना कर्ज माफी केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकाकडून कर्जे घेतली आहेत. अशा सर्व लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती शासनाला वेळेत कळविणे गरजेचे आहे परंतु काही बँकानी ती माहिती वेळेत व परिपूर्ण पाठवली नसल्याने अनेक गरजू लाभार्थी शेतकरी या कर्ज माफीपासून वंचित राहिलेले आहेत. त्यासाठी आजरा तालुक्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकाना याबाबत सूचना करणे व वंचित लाभार्थिंची माहिती घेऊन त्यांना लाभ मिळवून देणे गरजेचे आहे. यासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)गटाच्या वतीने आजरा तहसीलदार यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केलेली आहे. अनेक शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकाकडून कर्जे घेतलेली आहेत. त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी त्या बँकाकडून शेतकऱ्यांची माहिती वेळेत शासनाकडे जाणे गरजेचे आहे परंतु काही बँका ती माहिती वेळेत व परिपूर्ण न पाठविल्यामुळे अनेक शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे या सर्व बँकांच्या व्यवस्थापकांची तात्काळ एक बैठक आपल्या कार्यालयात लावावी जेणेकरून तालुक्यातील शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही. असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनावर संभाजी पाटील (उपजिल्हा प्रमुख), युवराज पोवार(तालुका अध्यक्ष), सुयश पाटील(युवासेना तालुका प्रमुख), संजय येसादे(तालुका संघटक), सुनील डोंगरे, संजयभाई सावंत, गोपाळ कदम, अशोक पोवार, रोहित होण्याळकर आदींच्या सह्या आहेत.
*कर्जमाफी संदर्भात तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या व्यवस्थापकांची बैठक घ्या
|