बातम्या

थकीत घरफाळ्यामुळे IIB कोचिंग क्लासेस सील

IIB coaching classes sealed due to outstanding housing loan


By nisha patil - 8/20/2026 12:50:28 PM
Share This News:



थकीत घरफाळ्यामुळे IIB कोचिंग क्लासेस सील

कोल्हापूर, ता. 20 : शाहूपुरी येथील IIB कोचिंग क्लासेसचा 41 लाख 58 हजार 144 रुपये घरफाळा थकीत असल्याने महानगरपालिकेच्या राजारामपुरी घरफाळा विभागामार्फत आज संबंधित मिळकतीवर सील बंदची कारवाई करण्यात आली. शाहूपुरी 3री गल्ली येथील सि.स.नं.741 मधील ही मिळकत रामचंद मोटूमल अहुजा यांच्या मालकीची आहे. थकीत घरफाळ्याची वसुली करण्यासाठी महापालिकेच्या घरफाळा विभागाने कारवाई करत कोचिंग क्लासेसची मिळकत सील केली आहे. तसेच संबंधित मालमत्तेच्या मालमत्ता पत्रकावर थकीत घरफाळ्याचा बोजा नोंदविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

सदरची कारवाई आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार, उपआयुक्त परितोष कंकाळ, सहा.आयुक्त डॉ.विजय पाटील व कर निर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत राजारामपुरी घरफाळा विभागाचे कर अधीक्षक दत्तप्रसाद माजगांवकर व कर्मचारऱ्यांनी सहभाग घेतला.


थकीत घरफाळ्यामुळे IIB कोचिंग क्लासेस सील
Total Views: 9