बातम्या
कोंडोशी गावाच्या प्रवेशद्वारावरील धोकादायक पुलाची तात्काळ दुरुस्ती करा; पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करा – मनसेची मागणी
By nisha patil - 7/31/2026 1:45:10 PM
Share This News:
कोंडोशी गावाच्या प्रवेशद्वारावरील धोकादायक पुलाची तात्काळ दुरुस्ती करा; पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करा – मनसेची मागणी
भुदरगड, प्रतिनिधी : भुदरगड तालुक्यातील कोंडोशी गावाच्या प्रवेशद्वारावरील ओढ्यावरील पूल धोकादायक अवस्थेत पोहोचला असून, कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पुलाबाबत कोंडोशी गावातील ग्रामस्थांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष राहुल मनोहर पाटील यांच्या निदर्शनास ही गंभीर बाब आणून दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
पाहणीदरम्यान पुलाचा एक भाग खचल्याचे तसेच आधारभिंतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. सध्या मुसळधार पावसामुळे ओढ्याच्या पाण्याचा प्रवाह वाढला असून, पुलाची स्थिती अधिकच धोकादायक बनली आहे. असे असतानाही या मार्गावरील वाहतूक सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या मार्गावरून दररोज विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असल्याने कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या पुलाची तांत्रिक पाहणी करून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करावे, अशी मागणी मनसेने केली आहे.
कोंडोशी गावाच्या प्रवेशद्वारावरील धोकादायक पुलाची तात्काळ दुरुस्ती करा; पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करा – मनसेची मागणी
|