बातम्या

कागलमध्ये लाडक्या माता-भगिनींनी मंत्री हसन मुश्रीफ यांना बांधली राखी

In Kagal beloved mothers and sisters


By nisha patil - 8/29/2026 1:51:37 PM
Share This News:



कागलमध्ये लाडक्या माता-भगिनींनी मंत्री हसन मुश्रीफ यांना बांधली राखी

औक्षण करून दिल्या आशीर्वादाच्या शुभेच्छा

कागलमध्ये रक्षाबंधनानिमित्त लाडक्या माता-भगिनींनी मंत्री हसन मुश्रीफ यांना राखी बांधून भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे नाते अधिक दृढ केले. माता-भगिनींनी पंचारतीने मंत्री मुश्रीफ यांचे औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले.

बेलेवाडी मासासह प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या बहिणजींनीही मंत्री हसन मुश्रीफ यांची औक्षण करून ओवाळणी केली. यावेळी रक्षाबंधनाचा उत्साह आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, “लाडक्या माता-भगिनींचे आशीर्वाद आणि पुण्याईची कवचकुंडले माझ्या पाठीशी आहेत. माता-भगिनींच्या अपार आशीर्वाद आणि प्रेमामुळेच आजवरची यशस्वी वाटचाल करता आली.”

माता-भगिनींनी दिलेले प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद हीच आपली मोठी ताकद असून, त्यांच्या सुख-दुःखात सदैव सहभागी राहण्याची भावना मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केली. रक्षाबंधनाच्या या सोहळ्यामुळे कागलमध्ये स्नेह, आपुलकी आणि बंधुभावाचे वातावरण अनुभवायला मिळाले.


कागलमध्ये लाडक्या माता-भगिनींनी मंत्री हसन मुश्रीफ यांना बांधली राखी
Total Views: 11