बातम्या
विवेकानंद मध्ये एन.एस.एस. उपक्रमांचे उदघाटन संपन्न
By nisha patil - 8/29/2026 1:01:28 PM
Share This News:
विवेकानंद मध्ये एन.एस.एस. उपक्रमांचे उदघाटन संपन्न
व खेलो इंडिया संवाद - युवा कनेक्ट
कोल्हापूर दि. 29 : विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2026 -27 या वर्षातील नियमित उपक्रमाचे उद्घाटन व खेलो इंडिया संवाद खेल की बात पी एम के साथ या उपक्रमांतर्गत राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब होते .संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे त्यांची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून विवेकानंद महाविद्यालयात 'खेलो इंडिया संवाद युवा कनेक्ट' या विशेष कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी माध्यमातून युवकांशी संवाद साधत क्रीडा, तंदुरुस्ती आणि विकसित भारताच्या संकल्पनेबाबत मार्गदर्शन केले.
युवकांच्या क्रीडा क्षेत्रातील सहभागाला चालना देणे, त्यांच्या आकांक्षांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये त्यांचा सहभाग वाढविणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता. यावेळी युवकांनी क्रीडा क्षेत्राकडे गांभीर्याने पाहून शिस्त, समर्पण, सातत्य आणि मेहनतीच्या बळावर दीर्घकालीन तयारी करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.
याप्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय खो खो खेळाडू वैष्णवी पवार व लॉन टेनिस खेळाडू ऐश्वर्या जाधव यांचा सत्कार करण्यात आला. या क्रीडापटूंनी आपल्या प्रवासातील अनुभव सांगताना यशासाठी शिस्त, सातत्य, समर्पण, मेहनत आणि तंदुरुस्तीचे महत्त्व अधोरेखित केले. 'खेलो इंडिया संवाद' हा देशाच्या क्रीडा विकासाला नवी दिशा देणारा आणि भारताच्या क्रीडा स्वप्नांना बळ देणारा उपक्रम असल्याची भावना क्रीडापटूंनी व्यक्त केली. क्रीडापटूंच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. संदीप पाटील, डॉ. प्रविण बागडे, डॉ.राजश्री पाटील, श्री.हेमंत पाटील , डॉ. किर्ती कुरणे ज्युनिअर कॉलेज एन.एस.एस. अधिकारी प्रा.हेमंत पाटील यांनी नियोजन केले. सूत्रसंचालन डॉ. सुप्रिया पाटील, डॉ. संपदा टिपकुर्ले यांनी केले यावेळी माय भारत जिल्हा युवा अधिकारी श्री स्वप्निल देशमुख उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्रबंधक श्री.सचिन धनवडे, श्री सदानंद दुर्गुळे, श्री. रोहित निगवे , श्री. संदीप पवार , श्री. सर्जेराव खोत , श्री. संजय शिवारे , श्री. संजय पोवार , श्री. राम बोंगे व इतर प्रशासकीय कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी ज्युनिअर व सिनिअर महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
विवेकानंद मध्ये एन.एस.एस. उपक्रमांचे उदघाटन संपन्न
|