बातम्या

शहाजी महाविद्यालयात स्टडी कॉर्नरचे उद्घाटन, पर्यावरणपूरक रक्षाबंधन 

Inauguration of Study Corner


By nisha patil - 8/29/2026 1:58:32 PM
Share This News:



शहाजी महाविद्यालयात स्टडी कॉर्नरचे उद्घाटन, पर्यावरणपूरक रक्षाबंधन 
   

कोल्हापूर : शहाजी महाविद्यालयातील विज्ञान विभाग व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने  स्टडी कॉर्नरचे उद्घाटन, पर्यावरणपूरक रक्षाबंधन व ‘ऑर्गानोव्हा’ प्रदर्शन या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी गणितशास्त्र,   संख्याशास्त्र,प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र व रसायनशास्त्र या विभागांच्या स्टडी कॉर्नरचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, विषयाची आवड, सर्जनशीलता व नाविन्यपूर्ण विचार विकसित व्हावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

यानंतर विविध विभागांच्या वतीने आकर्षक प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले. वनस्पतिशास्त्र विभागाने भित्तीपत्रकांचे तसेच बियांच्या राख्यांचे प्रदर्शन आयोजित केले. प्राणिशास्त्र विभागाने ‘Endocrine Gland’ या विषयावर तसेच क्ले आर्टचे प्रदर्शन सादर केले.रसायनशास्त्र विभागाच्या वतीने “ऑरगॅनो केम प्रॉडक्ट्स एक्झिबिशन” आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सेंद्रिय व रासायनिक घटकांचा वापर करून हँड सॅनिटायझर, साबण, परफ्युम, फेसवॉश, मेहंदी, धूप यांसारखी विविध उत्पादने तयार केली. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना उत्पादन निर्मिती व उद्योजकतेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. विद्यार्थ्यांनी तयार केलेली उत्पादने आणि त्यांचे सादरीकरण उल्लेखनीय व कौतुकास्पद होते व विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध वस्तू, शैक्षणिक साहित्य व माहितीचे उत्स्फूर्तपणे सादरीकरण केले.

 ‘पर्यावरणपूरक रक्षाबंधन’ या उपक्रमात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी झाडाला पर्यावरणपूरक राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. वृक्षांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून, निसर्गाशी आपले नाते अधिक दृढ करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण सर यांनी विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. त्यांनी विज्ञानाधारित उपक्रम, स्टडी कॉर्नर, विविध प्रदर्शने आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे महत्त्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

या कार्यक्रमास प्रबंधक श्री. रवींद्र भोसले, अधीक्षक श्री. मनीष भोसले, डॉ. आर. डी. मांडणीकर, विज्ञान विभागाच्या समन्वयक प्रा. ए. व्ही. मगदूम-पाटील मॅडम, विज्ञान विभागातील प्राध्यापकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या संपूर्ण उपक्रमासाठी संस्थेचे चेअरमन माननीय मानसिंग दादा बोंद्रे यांची प्रेरणा व मार्गदर्शन लाभले.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, स्वनिर्मितीची प्रेरणा व सामाजिक बांधिलकी निर्माण झाली. विविध शैक्षणिक, सर्जनशील व पर्यावरणपूरक उपक्रमांच्या यशस्वी आयोजनामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


शहाजी महाविद्यालयात स्टडी कॉर्नरचे उद्घाटन, पर्यावरणपूरक रक्षाबंधन 
Total Views: 14