बातम्या

शहाजी मध्ये सामाजिकशास्त्रे अभ्यास मंडळाचे उद्घाटन 

Inauguration of the Social Sciences Board of Studies at Shahaji


By nisha patil - 7/27/2026 3:49:08 PM
Share This News:



शहाजी मध्ये सामाजिकशास्त्रे अभ्यास मंडळाचे उद्घाटन 

कोल्हापूर : दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील सामाजिक शास्त्रे विभागांच्या अभ्यास मंडळाचे उद्घाटन संपन्न झाले. 
   

शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख व महावीर अध्यासनाचे समन्वयक डॉ. विजय काकडे यांनी समाजशास्त्राचा अभ्यास का करावा या विषयावर व्याख्यान दिले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 
   

श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे या कार्यक्रमास मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. 
   

श्री काकडे म्हणाले, रोजगाराच्या संधी तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे बदललेल्या आहेत. सामाजिक शास्त्रांमध्येही अनेक संधी उपलब्ध आहेत. मात्र त्यांचे स्वरूप बदललेले आहेत.  इतिहास, भूगोलशास्त्र  अर्थशास्त्र  राज्यशास्त्र व इतर सामाजिक शास्त्रामध्ये अनेक संधी आहेत. विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करून या संधी प्राप्त करून घ्याव्यात असे आवाहन त्यांनी यावेळी केले .आय क्यू ए सी समन्वयक डॉ.आर.डी.मांडणीकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. पी. पी .भाटे यांनी सूत्रसंचालन केले . डॉ. ए .बी.बलुगडे यांनी आभार मानले. 
  डॉ. के. एम. देसाई, डॉ. डी. के वळवी, डॉ. डी. एल.काशीद- पाटील, डॉ. एस. व्ही. शिखरे, डॉ. सुनिता राठोड, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी , विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.


शहाजी मध्ये सामाजिकशास्त्रे अभ्यास मंडळाचे उद्घाटन 
Total Views: 11