बातम्या

भारतीय जनता पार्टी आजराच्या वतीने विधायक कार्यें

Indea janta party


By nisha patil - 7/22/2026 8:42:48 PM
Share This News:



**भारतीय जनता पार्टी आजराच्या वतीने विधायक कार्यें*

**मुख्यामंत्री फडणवीस आणि अजितदादांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून रक्तदान, रुग्णांना फळे वाटप व वृक्षरोपांच्या वितरणाचे कार्यक्रम संपन्न*

*आजरा(हसन तकीलदार)*:-भारतीय जनता पार्टी आजरा यांचे वतीने भाजपा तालुका अध्यक्ष अनिकेत चराटी यांनी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छप्पनाव्या वाढदिवस, व राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजितदादा पवारांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप व रक्तदान शिबिराचे व वृक्ष रोपे वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी अकरा वाजता भाजपाचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते व ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अतुल पाटील ,सर्व डॉक्टर्स , परिचारिका आणि कर्मचारी यांचे उपस्थितीत रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.

तसेच अजितदादा यांचे स्मृतींना अभिवादन करणेत आले. त्यानंतर आजरा महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करणेत आले या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपाचे तालुका अध्यक्ष अनिकेत चराटी यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने 56 युवा कार्यकर्त्यांनी रक्तदान केले या कार्यक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला, तसेच यावेळी हर्षवर्धन महागावकर व जयवंत सुतार यांनी 56 वृक्षाची रोपे ,आजरा महाविद्यालयाचे अधिक्षक योगेश पाटील यांचेकडे सुपूर्द केली. भाजपाचे वतीने देवेंद्र फडणवीस यांना दीर्घायुष लाभो, देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळो अशी प्रार्थना करणेत आली ,या कार्यक्रमाचे अभिजित रांगणेकर (आजरा शहर अध्यक्ष,भाजपा )व कार्यकर्त्यांनी नेटके नियोजन केले .निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, सी.आर. देसाई ,अनिकेत चराटी व जयवंत सुतार यांचे हस्ते रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याना प्रमाणपत्र व भेटवस्तूंचे वाटप करणेत आले.**त्याचप्रमाणे अभिजित केसरकर यांनी 100 वे विक्रमी रक्तदान आज या रक्तदान शिबिरात पूर्ण केले. त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.*

यावेळी दशरथ अमृते, शैलेश मुळीक,समीर पारदे , संतोष चौगले, उमेश घोरपडे, आनंदा कातकर , उमेश पारपोलकर, मनीष टोपले, संदीप देसाई, प्रकाश कविटकर, आकाश पाटील, अभिजित वंजारे, कुणाल भोसले, अनिकेत देऊसकर, अमोल पाटील, यशवंत गिरी, आनंदा कातकर, आनंदा मोहिते, अमर पाटील, उमेश पारपोलकर, पंकज वास्कर, दयानंद बागवे, युवा कार्यकर्ते तसेच महाविद्यालयातील एन. सी.सी.कॅडेट उपस्थित होते.


भारतीय जनता पार्टी आजराच्या वतीने विधायक कार्यें
Total Views: 609