बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
By nisha patil - 8/15/2026 1:57:42 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
“युवकांनी राष्ट्र ऐक्याच्या भावनेतून देशाला प्रगतीपथाकडे न्यावे. ”
मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे, कार्याध्यक्ष, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर
कोल्हापूर दि. 15 : स्वातंत्र्य, समता, बंधूभाव, एकसंघ राष्ट् व मानवतेचा संदेश देणाऱ्या घटनेने आपल्या देशाला सामाजिक सुरक्षितता, सहिष्णूता व स्थैर्य प्राप्त करुन दिले. आजच्या युवकांनी राष्ट्र ऐक्याच्या भावनेतून देशाला प्रगतीपथाकडे न्यावे. लाखो भारतीयांच्या त्यागातून व बलिदानातून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्याचे स्वप्न् साकार झाले. एकात्मता ही भारताची शक्ती आहे. ही एकात्मता जपण्यासाठी प्रत्येक भारतीयाने प्रयत्न् करायला हवा. ज्या मातीत जन्मलो त्याची कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी विश्वबंधूत्वाची शिकवण आपल्या प्रार्थनेतून दिली. त्याचे अवलंबन युवकांनी करावे, विद्यार्थ्यांमधील ज्ञानज्योत प्रज्वलीत करण्याचे काम गुरुदेव कार्यकर्त्यांनी करावे, शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करुन आपल्या ज्ञानाची उंची वाढवावी व चांगले विद्यार्थी घडवावेत.
अन्यायाविरुध्द संघर्ष करण्याची भूमिका युवकांनी घ्यावी. असे मत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी ध्वजारोहण समारंभात बोलताना मांडले. विवेकानंद कॉलेजच्या प्रांगणात प्रमुख पाहुणे संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करणेत आले. यावेळी एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी शानदार परेड संचलन सादर केले. यावेळी संस्थेचे सीईओ मा.श्री. कौस्तुभ गावडे, विवेकानंद कॉलेजचे प्र.प्राचार्य डॉ. सी. बी.पाटील व संस्था परिसरातील शाखा प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वंदे मातरम, राष्ट्रीगीत व महाराष्ट्र गीताचे सामुहिक गायन करण्यात आले. तसेच नशामुक्त महाराष्ट्र होणेसाठी सर्व उपस्थितांना शपथ देण्यात आली.
यानिमित्ताने शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवनमध्ये आयोजित केलेल्या समारंभात विवेकानंद कॉलेजमधील पुस्तक लेखक, नेट, सेट, पीएच.डी. पदवी प्राप्त् प्राध्यापकांचा सत्कार प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचे हस्ते करणेत आला. उपस्थित गुरुदेव कार्यकर्त्यांना मा.कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. विराज जाधव, डॉ. कैलास पाटील, डॉ.अतिश पाटील, डॉ. संजय लठ्ठे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र.प्राचार्य डॉ.सी.बी.पाटील यांनी केले. स्टाफ सेक्रेटरी डॉ. कविता तिवडे यांनी आभार मानले. सुत्रसंचालन डॉ. सुप्रिया पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे संयोजन जिमखाना प्रमुख प्रा.डॉ.विकास जाधव, डॉ.नम्रता नरेवाडीकर, लेफ्टनंट जे.आर.भरमगोंडा, प्रा संतोष कुंडले, डॉ.ई.बी.आळवेकर, डॉ.राजश्री पाटील, डॉ.बी.टी.दांगट, प्रा सौ शिल्पा भोसले, प्रा.एम.आर.नवले, रजिस्ट्रार श्री. एस के धनवडे, प्रशासकीय कर्मचारी यांनी केले. यावेळी संस्था परिसरातील डॉ.बापूजी साळुंखे इंजिनिअरींग कॉलेज, डॉ.बापूजी साळुंखे हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिटयूट, सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेज, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
विवेकानंद कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
|