बातम्या
*रोझरी स्कुलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
By nisha patil - 8/16/2026 11:43:55 PM
Share This News:
*रोझरी स्कुलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
*विविधतेतील एकता या विषयावर भारतातील संपूर्ण राज्यांचे दर्शन
*आजरा(हसन तकीलदार):-स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रोझरी इंग्लिश स्कुलमध्ये "विविधतेतील एकता या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक तुकडीतील विद्यार्थ्यांनी आपल्या देशातील प्रत्येक राज्याचे वैशिष्ठ, पेहराव, खाद्यसंस्कृती, लोकनृत्य व संस्कृतीचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेसीका कुतिन्हो, पाहुण्यांचे स्वागत व परिचय स्टीफन डिसोझा यांनी केले तर ध्वजारोहण महाराष्ट्र पोलीस मध्ये नुकतीच भरती झालेली रोझरीची माजी विद्यार्थिनी न्यूरल डिसोझा यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाल्या की, आहे त्याच पदावर समाधान न मानता स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून मोठ्या पदावर झेप घेण्याचा प्रयत्न करा असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.
प्रमुख पाहुणे म्हणून सौ. व श्री. ऑस्टीन फर्नांडिस, व्यापारी असोसियेशनचे अध्यक्ष सौ. व श्री. महेश नार्वेकर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करताना ज्युनियर कॉलेज तामिळनाडू स्मिता पाटील, 10 वी तेलंगणा विजय केसरकर, 9 वी कर्नाटक शैलजा कांबळे, 8वी पंजाब संयोगिता वाळके , 5 वी बंगाल आशिष फर्नांडिस, एस. आर. के.जी. जम्मू काश्मीर अवेलीन मंतेरो, 3 री नागालँड एलीझाबेथ फर्नांडिस, 1 ली गोवा सांचेझ डिसोझा, ज्युनियर के. जी. ओडिसा रिझवाना काकतिकर, 4 थी महाराष्ट्र जेसीका कुतिन्हो यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळेचे मॅनेजर फादर नेलव्हिन पायस यांनी कार्यक्रमाचे उद्देश व शिक्षकांनी केलेल्या नियोजनाची माहिती दिली.यावेळी मुख्याध्यापक मनवेल बारदेस्कर,डॉन्मिक डिसोझा, सांझेस कुतिन्हो,स्टीफन डिसोझा, स्टीफन फेर्नांडिस, ब्रदर जितन आदिजण उपस्थित होते. आभार सौ.शैलजा कांबळे यांनी मानले.
*रोझरी स्कुलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
|