बातम्या

मराठा समाजावर अन्याय खपवून घेणार नाही.

Injustice against the Maratha community will not be tolerated


By nisha patil - 7/21/2026 11:56:47 AM
Share This News:



मराठा समाजावर अन्याय खपवून घेणार नाही.
 

 एमआयडीसी रद्द साठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करणार.. संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील .मौजे सैनिक टाकळी गावचा सैनिकी इतिहास पाहता गावातील 18 शहीद जवानांनी देशासाठी आपले सर्वोच्च प्राणांचे बलिदान दिलेल आहे. अशा गावचा अभिमान शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्याला आहे.
 

अशा गावांमध्ये शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरसो यांच्या मागणीनुसार एमआयडीसी लादली जात आहे.
 

 यापूर्वी गावाने सैनिकी परंपरेला अनुसरून त्या गायरान जमिनीवरती सैनिक स्कूल, केंद्रीय विद्यालय ,भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रासाठी क्रीडांगण, माजी सैनिक हाऊसिंग सोसायटी, देवराई,  यासारख्या मागण्या केलेल्या आहेत .
 

या सर्व मागण्या डावलून त्या ठिकाणी शिरोळ तालुक्याचे विद्यमान आमदार  यांच्याकडून एमआयडीसी लादण्याचा प्रयत्न होत आहे. शहीद जवानांच्या भूमीमध्ये एमआयडीसी लादुन इथली संस्कृती, मराठा समाजाची अस्मिता  नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. 
या संदर्भात गावातील माजी सैनिक , तसेच संघटनेच्या पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळाने संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांची अंकुश नगर ता.अंबड जिल्हा जालना  येथे त्यांच्या निवासस्थानी   भेट घेतली. 
दादांनी चर्चेदरम्यान लोकांच्या सर्व मागण्या ऐकून घेऊन मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न होत असेल तर खपवून घेतला जाणार नाही असा कडक शब्दात इशारा दिला.
तसेच एमआयडीसी रद्द साठी स्वतः वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करणार आहेत. 
त्यानंतर शिष्टमंडळाने अंतरावली सराटी या गावातील मराठा आरक्षण आंदोलन स्थळी भेट दिली .
त्याठिकाणीनाहुन प्रशासनाने गावाच्या मागणीनुसार विकास आराखडा करुन एमआयडीसी रद्दची कार्यवाही करावी अन्यथा सोमवारी 27 जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला. 
यावेळी माजी सैनिक रिटा.कॅप्टन प्रकाश खोत, एअर फोर्स रिटा.वॉरंट ऑफिसर अमर पाटील, आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, सकल मराठा समाज तालुकाध्यक्ष अमर पाटील, विनोद पाटील उपस्थित होते .


मराठा समाजावर अन्याय खपवून घेणार नाही.
Total Views: 62