बातम्या
जांबोटीच्या विकासासाठी अरुण महाराजांची पालकमंत्री जारकीहोळींशी भेट
By nisha patil - 8/23/2026 11:54:18 AM
Share This News:
जांबोटीच्या विकासासाठी अरुण महाराजांची पालकमंत्री जारकीहोळींशी भेट
बेळगाव : जांबोटी-कणकुंबी भागातील विविध मूलभूत समस्यांबाबत मंजुनाथ दुगदिवी ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष अरुण महाराज कणगुटकर व त्यांच्या शिष्यगणांनी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची बेंगळूर येथे भेट घेतली. यावेळी जांबोटीला प्रत्यक्ष भेट देऊन स्थानिकांच्या समस्या जाणून घेण्याची मागणी करण्यात आली.
जांबोटी येथे हिंदू समाजासाठी स्मशानभूमीची नितांत गरज असून, प्रशासनाने मंजूर केलेल्या जागेवर शेड उभारावे तसेच वन विभागाची जागा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच जांबोटी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करून २४ तास आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली.
आरोग्य केंद्रासाठी ट्रस्टमार्फत जागा उपलब्ध करून देण्याची ग्वाही अरुण महाराजांनी दिली. या मागण्यांची दखल घेत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी रविवारी जांबोटीला भेट देण्याचे आश्वासन दिले.
जांबोटीच्या विकासासाठी अरुण महाराजांची पालकमंत्री जारकीहोळींशी भेट
|