बातम्या

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी जनसेवा सप्ताहाचा प्रारंभ

Janseva Saptah Public Service Week to commence


By nisha patil - 7/20/2026 8:27:55 PM
Share This News:



अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी जनसेवा सप्ताहाचा प्रारंभ
        
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते राष्ट्रवादी कार्यालयात होणार कार्यक्रम 
         
पत्रकार विजय चोरमारे यांचे होणार व्याख्यान

         
कोल्हापूर, दि. २०: महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या जनसेवा सप्ताहाची सुरुवात बुधवारी दि. २२  होणार आहे. कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्केट यार्डमधील कार्यालयात सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत अभिवादन दिवंगत श्री. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाणार आहे. तसेच; पत्रकार विजय चोरमारे यांचे "महाराष्ट्राच्या जडणघडणीत अजितदादा पवार यांचे योगदान" या विषयावर होणार व्याख्यान होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. 

                  
या पत्रकात श्री. आसुर्लेकर- पाटील यांनी पुढे म्हटले आहे, महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दि. २२ जुलैपासून कोल्हापूर जिल्ह्यात जनसेवा सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहात आरोग्य, स्वच्छता, समाज प्रबोधन आदी लोकोपयोगी उपक्रम केले जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतेमंडळींनी, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात मोठ्या संख्येने जमावे, असे आवाहनही जिल्हाध्यक्ष श्री. आसुर्लेकर यांनी केले आहे.


अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी जनसेवा सप्ताहाचा प्रारंभ
Total Views: 13