बातम्या

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी  एआयएमएलच्या ६८ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्स 

Job offers for 68 AIML students from D Y Patil Engineering


By nisha patil - 8/25/2026 1:20:07 PM
Share This News:



डी. वाय. पाटील अभियांत्रिकी  एआयएमएलच्या ६८ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्स 
 

-मोव्हेट, एचपीसह विविध कंपन्यामध्ये निवड -मोव्हेटमध्ये ९ लाखांचे सर्वोच्च पॅकेज

कोल्हापूर : डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कसबा बावडा येथील आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग (एआयएमएल) विभागातील विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विभागातील विद्यार्थ्यांना २९ हून अधिक नामांकित कंपन्यांकडून ६८ प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त झाल्या आहेत. मोव्हेट या कंपनीमध्ये सना मुजावर हिला ९ लाख रुपये वार्षिक सर्वोच्च पॅकेज मिळाले आहे. 

महाविद्यालयात झालेली विविध प्लेसमेंट ड्राईव्हद्वारे ही निवडा झाली आहे.  

लॉन्च्ड ग्लोबल या कंपनीनमध्ये सर्वाधिक १२ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. एड्युव्हर्सिटी, बंगळुरूने १० विद्यार्थ्यांची, अनलॉक्स अकॅडमी ८ इन्फोसिसने ६, वॉलस्टार टेक्नॉलॉजीजने ४ तर फोक्सवॅगन प्रा. लि. ने ३ विद्यार्थ्यांची निवड केली आहे.

यामध्ये मोव्हेटमध्ये ९ लाख रुपये, एचपीमध्ये ८.५ लाख, ग्लोलॉजिक्स सोल्युशन्समध्ये ७.२ लाख रुपये, लॉन्च्ड ग्लोबलमध्ये ७ लाख रुपये, अनलॉक्स अकॅडमीमध्ये ६ लाख आणि झंवर ग्रुप मध्ये ५.५ लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळाले आहे. फॉक्स सोल्युशन्समध्ये ५.४६ लाख रुपये आणि मायक्रोलाइजमध्ये ४.८ लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळाले आहे. याशिवाय डिलॉईट सायबर गुरुकुल प्रोग्राम, एड्यु व्हर्सिटी, एक्सेलआर आणि इतर कंपन्यांनीही विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राच्या गरजांनुसार तांत्रिक प्रशिक्षण, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंगशी संबंधित कौशल्यविकास, कोडिंग प्रॅक्टिस, कम्युनिकेशन स्किल्स, सॉफ्ट स्किल्स, मॉक इंटरव्ह्यू, ग्रुप डिस्कशन, करिअर काउन्सेलिंग तसेच प्लेसमेंटपूर्व विशेष प्रशिक्षण नियमितपणे दिले जाते. याचबरोबर उद्योग–महाविद्यालय सहकार्य, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्लेसमेंट उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये करिअरच्या उत्कृष्ट संधी उपलब्ध होत असल्याचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी सांगितले.

महाविद्यालयाला वॉशिंग्टन अकॉर्डच्या निकषांनुसार नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिटेशन (एनबीए) मानांकन प्राप्त झाले असून, शिवाजी विद्यापीठाकडून अधिकारप्रदत्त स्वायत्त संस्थेचा दर्जाही मिळाला आहे. 

या यशासाठी अधिष्ठाता (सीडीसीआर) प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे, एआयएमएल विभागप्रमुख प्रा. डॉ. सिद्धेश्वर पाटील, प्लेसमेंट समन्वयक तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, सी.एच.आर.ओ. श्रीलेखा साटम, प्राचार्य डॉ. संतोष चेडे आणि रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
 


डी. वाय. पाटील अभियांत्रिकी  एआयएमएलच्या ६८ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्स 
Total Views: 14