बातम्या

कागल : व्हन्नूर येथे पहिले सरपंच व लोकप्रिय शाहीर बाळाराम संकपाळ यांची 105 वी जयंती उत्साहात साजरी

Kagal The 105th birth anniversary of the first Sarpanch


By nisha patil - 10/8/2026 3:10:17 PM
Share This News:



कागल : व्हन्नूर येथे पहिले सरपंच व लोकप्रिय शाहीर बाळाराम संकपाळ यांची 105 वी जयंती उत्साहात साजरी

- कागल प्रतिनिधी: अजित बोडके व्हन्नूर (ता.कागल) - व्हन्नूर गावचे पहिले सरपंच व लोकप्रिय शाहीर बाळाराम संकपाळ यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त आदर्श विद्या मंदिर, व्हन्नूर येथे विद्यार्थ्यांना वही, बचत गुल्लक (भिशी) व खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सोमवार दि. 10 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून करण्यात आली. 

शाळेचे सास्मिले सर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर कागल तालुका किसान काँग्रेसचे अध्यक्ष श्री. रणजीत पाटील यांच्या हस्ते शाहीर बाळाराम संकपाळ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

प्रास्ताविकात किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री. अनिल संकपाळ यांनी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील दादा यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला. तसेच शाहीर संकपाळ यांच्या सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच पैशाच्या बचतीची सवय लागावी यासाठी बचत गुल्लकचे (भिशी) महत्त्व पटवून दिले.

यावेळी विद्यार्थ्यांना वह्या, बचत गुल्लक व खाऊचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास कागल तालुका किसान काँग्रेस अध्यक्ष रणजीत पाटील, उपाध्यक्ष अनिल संकपाळ, सरचिटणीस राहुल घराळ, सामाजिक कार्यकर्ते भाऊसो माने, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष साताप्पा खाडे, संदीप धनवडे, बाबू संकपाळ, मुख्याध्यापक जाधव सर, सास्मिले सर, सुतार मॅडम, जोशीलकर मॅडम यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आभार सामाजिक कार्यकर्ते श्री. भाऊसो माने यांनी मानले.

 


कागल : व्हन्नूर येथे पहिले सरपंच व लोकप्रिय शाहीर बाळाराम संकपाळ यांची 105 वी जयंती उत्साहात साजरी
Total Views: 6