कानोली जलजीवन मिशन प्रकरण; तक्रार अर्ज महिनाभर धूळ खात, चौकशीचे बीडीओंचे लेखी आश्वासन

Kanoli Jal Jeevan Mission case

By nisha patil - 7/28/2026 3:27:17 PM
Share This News:

कानोली जलजीवन मिशन प्रकरण; तक्रार अर्ज महिनाभर धूळ खात, चौकशीचे बीडीओंचे लेखी आश्वासन
 
आजरा तालुक्यातील कानोली ग्रामपंचायतीतील जल जीवन मिशन योजनेतील कथित अनियमिततेबाबत एका ग्रामस्थाने जून महिन्यात पंचायत समितीकडे तक्रार अर्ज दिला होता. मात्र हा अर्ज कोणतीही कारवाई न होता कार्यालयातच पडून असल्याचे आज निदर्शनास आले.
 
 त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी (BDO) या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे लेखी पत्र देत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
 
दरम्यान, जल जीवन मिशनच्या ताबा पट्टीवर ग्रामसेवकांची सही नसणे, काम पूर्ण होण्यापूर्वीच ताबा दिल्याचा आरोप आणि कथित आर्थिक व्यवहारांच्या चर्चेमुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

कानोली जलजीवन मिशन प्रकरण; तक्रार अर्ज महिनाभर धूळ खात, चौकशीचे बीडीओंचे लेखी आश्वासन
Total Views: 11