बातम्या
विवेकानंद कॉलेज मध्ये कारगिल विजय दिन संपन्न
By nisha patil - 7/27/2026 4:13:31 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेज मध्ये कारगिल विजय दिन संपन्न
कोल्हापूर दि. 27 : 26 जुलै हा दिवस स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात गौरवशाली दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. भारतीय स्वातंत्र्यानंतर शेजारील राष्ट्रांपासून भारताच्या सार्वभौमत्वाला ऐक्याला आणि अखंडतेला आवाहन देण्याकरिता घुसखोरी दहशतवादासारख्या छुप्या घातक कृती मधून पारंपार केला जातो. भारतीय संरक्षण दलामार्फत वारंवार होणाऱ्या या देश विघातकृतींना नेस्तनाबुत करण्याकरिता भारतीय जवान सीमेवर अहोरात्र देश धर्माचे पालन करतात .
तीन मे 1999 रोजी उत्तर भारतीय सीमेमध्ये समाजकंटक दहशतवाद्यांची घुसखोरी झाली आणि त्यांच्यासोबत निकराच्या लढाईत भारतीय लष्करी आणि निमलष्करी दलाचे अधिकारी आणि जवान शहीद झाले. 26 जुलै 1999 रोजी भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा बिमोड करून आपल्या अतुलनीय पराक्रमाचा आदर्श सर्व जगासमोर ठेवला. या 27व्या विजय दिनाच्या स्मरणार्थ विवेकानंद कॉलेज मधील राष्ट्रीय छात्र सेने द्वारा वीरांना आदरांजली आणि पराक्रमाचे स्मरण करण्यात आले . सदर कार्यक्रमाचे आयोजन एन.सी.सी. विभागातील लेफ्ट . जे आर भरमगोंडा . डॉ. नम्रता नरेवाडीकर CTO यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांच्या मार्गदर्शनाखाली केले. सदर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना कारगिल युद्धाविषयी माहिती देण्यात आली .कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
विवेकानंद कॉलेज मध्ये कारगिल विजय दिन संपन्न
|