बातम्या
आमदार केसरकर, जिल्हाधिकाऱ्यांची सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेची पाहणी
By nisha patil - 7/14/2026 6:34:12 PM
Share This News:
आमदार केसरकर, जिल्हाधिकाऱ्यांची सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेची पाहणी
सिंधुदुर्ग - गवस शुभम आमदार दिपक केसरकर व जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेची प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा आढावा घेतला. झिरंग येथील उंच पाण्याची टाकी तसेच विविध भागांतील पाइपलाइन व रस्ते पुनर्स्थापना कामांची तपासणी करण्यात आली.
योजनेची उर्वरित कामे दर्जेदार पद्धतीने व निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या. नागरिकांना सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामांना गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी दिले. त्यानंतर नगरपरिषद कार्यालयात प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
यावेळी नगराध्यक्षा श्रद्धा लखम भोसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, मुख्याधिकारी विनायक औंधकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता राजेश कुलकर्णी, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, पर्यटन समिती सभापती मोहिनी मडगांवकर, नियोजन सभापती मोतीराम नेवगी, नगरसेविका सुकन्या टोपले, ॲड. सायली काशीनाथ दुभाषी, नगरसेवक खेमराज कुडतरकर, देवेंद्र टेमकर, तौकीर शेख, पीएमसी ॲक्वॉकॉन कन्सल्टंट ॲण्ड इंजिनिअर्स प्रा. लि.चे राहुल सूर्यवंशी तसेच मक्तेदार विलास एस. जगताप उपस्थित होते.
आमदार केसरकर, जिल्हाधिकाऱ्यांची सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेची पाहणी
|