बातम्या
‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी दुमदुमले कोल्हापूर; हिंदू एकता आंदोलनाची मशाल मिरवणूक
By nisha patil - 8/14/2026 8:52:12 PM
Share This News:
‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी दुमदुमले कोल्हापूर; हिंदू एकता आंदोलनाची मशाल मिरवणूक
कोल्हापूर, दि. १४ : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला स्वातंत्र्यवीर, क्रांतिकारक आणि हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी हिंदू एकता आंदोलन, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य मशाल मिरवणूक आज मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात पार पडली.
मिरवणुकीस प्रारंभ करण्यापूर्वी हिंदू एकता आंदोलनाचे ज्येष्ठ कार्यकर्ते हिंदुराव शेळके, गजानन तोडकर आणि सुधाकर वडगावकर यांच्या हस्ते मशालींचे पूजन करण्यात आले. त्यानंतर हिंदू एकता आंदोलन कार्यालयातून मशाल मिरवणुकीला प्रारंभ झाला.
यानंतर मिरजकर तिकटी येथे पोहोचलेल्या मिरवणुकीत स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतिस्तंभाचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. पुढे बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची टिक्की या मार्गाने मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले आणि मिरवणुकीचा समारोप झाला..
यानंतर मिरजकर तिकटी येथे पोहोचलेल्या मिरवणुकीत स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतिस्तंभाचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. पुढे बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची टिक्की या मार्गाने मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले आणि मिरवणुकीचा समारोप झाला.
मिरवणुकीदरम्यान कार्यकर्त्यांनी “वंदे मातरम्”, “भारत माता की जय”, “जय शिवराय”, “जय श्रीराम” अशा देशभक्तीपर घोषणा देत संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीच्या वातावरणाने दुमदुमून सोडला. मोठ्या संख्येने हिंदू एकता आंदोलनाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध हिंदुत्ववादी संघटनांचे प्रमुख तसेच हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते या मिरवणुकीत सहभागी झाले होते.
यावेळी हिंदू एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष दिपक देसाई, शहराध्यक्ष विलास मोहिते, गजानन तोडकर, अजिंक्य आपके, हिंदुराव शेळके, श्रिकांत पाऊंडकर, अजित तोडकर, सुधाकर वडगावकर, आनंदराव कवडे, पांडुरंग कदम, बबन लगारे, विजय शेळके, शांताराम इंगवले, अनिल दिंडे, राजू तोरस्कर, अभिजीत पाटील, केदार मुनिश्वर, नंदू घोरपडे, विकास जाधव, विक्रम जरग, पूजा शिंदे, मंदार कुलकर्णी, सौरभ निकम, विनायक पोळ, नंदू आहीर, अनिरुद्ध कोल्हापूरे यांच्यासह हिंदू एकता आंदोलनचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाची आठवण जागविणारी ही मशाल मिरवणूक कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली.
‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी दुमदुमले कोल्हापूर; हिंदू एकता आंदोलनाची मशाल मिरवणूक
|