बातम्या
अनुसूचित जाती आरक्षण बचाव समिती, कोल्हापूरची गडहिंग्लज येथे बैठक संपन्न
By nisha patil - 8/4/2026 4:26:33 PM
Share This News:
**अनुसूचित जाती आरक्षण बचाव समिती, कोल्हापूरची गडहिंग्लज येथे बैठक संपन्न*
**आजरा (हसन तकीलदार )**:-अनुसूचित जातीचे बोगस दाखले देणाऱ्या प्रशासन अधिकाऱ्यांसह, अधिकाऱ्यांना दबावाने दाखले देण्यास भाग पाडणाऱ्या मंत्र्यांना सहआरोपी करा!
श्रीपतराव शिंदेंचे खरे वैचारिक वारसदार आम्हीच आहोत असे उत्तम कांबळे (आर. पी. आय. जिल्हाध्यक्ष )यांनी यावेळी म्हटले तर पुढे ते म्हणाले की,
अनुसूचित जाती आरक्षण बचाव समितीच्या वतीने गडहिंग्लज प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार!
अनुसूचित जाती आरक्षण बचाव समितीच्या वतीने आज गडहिंग्लज येथील अवधूत दर्शन हॉटेलमध्ये आजरा, चंदगड व गडहिंग्लज तालुक्याच्या प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक घेण्यात आली.
या बैठकीचे अध्यक्षस्थान कोल्हापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय)चे जिल्हाध्यक्ष उत्तम दादा कांबळे यांनी भूषविले.
जिल्ह्याचे ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय)चे जिल्हाध्यक्ष उत्तम दादा कांबळे म्हणाले,श्रीपतराव शिंदे साहेब असते तर गैर जातीच्या उमेदवाराला कधीच उमेदवारी दिली नसती त्यांनी विचाराबरोबर आंबेडकरी जनतेबरोबर नेहमी राहिले असते.परंतु जाणून बुजून त्यांच्याच रक्ताच्या वारसा श्रीपतराव शिंदे साहेबांच्या विचाराला तिलांजली देण्याचे काम केलेल आहे. ही बाब अत्यंत वाईट आणि श्रीपतराव शिंदे साहेबांच्या चळवळीला छेद देणारे आहे.
बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई व त्यांना सहआरोपी करण्यात यावे.दबाव टाकणाऱ्या मंत्र्यांनाही कायद्याच्या कक्षेत आणावे. अनुसूचित जाती आरक्षणाची अखंडता अबाधित ठेवावी. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कोल्हापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते व ब्लॅक पॅंथर चळवळीचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई,संविधान संवर्धन चळवळीचे संघटक संग्राम सावंत, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे सुरेश थरकार, आर. पी आय. चे तालुका अध्यक्ष दिलीप कांबळे यांनी बैठकीला मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची प्रास्ताविका आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कांबळे यांनी केली.
बैठकीत एकमताने ठरविण्यात आले की, अनुसूचित जातीच्या बोगस प्रमाणपत्र प्रकरणात संबंधित प्रशासन अधिकाऱ्यांसोबतच, अधिकाऱ्यांवर दबाव टाकून बोगस दाखले मिळवून देणाऱ्या मंत्र्यांनाही सहआरोपी करण्यात यावे. यासाठी समिती कायदेशीर व प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा करणार आहे.
बैठकीत सर्व कार्यकर्त्यांनी एका सुरात घोषणा दिली की, “श्रीपतराव शिंदेंचे खरे वैचारिक वारसदार आम्हीच आहोत!” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेल्या अनुसूचित जाती आरक्षणाच्या हक्काला कोणत्याही स्वरूपात धक्का पोहोचू नये, यासाठी समिती सतर्क राहील.
समितीने निर्णय घेतला की, अनुसूचित जाती आरक्षण बचाव समितीच्या वतीने गडहिंग्लज प्रांत कार्यालयावर लवकरच भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात आजरा, चंदगड, गडहिंग्लज तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील अनुसूचित जाती समाजातील हजारो कार्यकर्ते व नागरिक सहभागी होणार आहेत.
समितीचे नेते उत्तम दादा कांबळे यांनी सांगितले, “आरक्षण हा डॉ. बाबासाहेबांच्या संविधानातील मूलभूत हक्क आहे. बोगस दाखले देऊन खऱ्या गरजू अनुसूचित जाती समाजाला न्याय नाकारला जाणार नाही. आम्ही श्रीपतराव शिंदेंच्या विचारांचे खरे वारसदार आहोत आणि आरक्षणाच्या रक्षणासाठी कुठल्याही स्तरावर लढा देण्यास तयार आहोत.”
ब्लॅक पॅंथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांनी आवाहन केले, बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई व त्यांना सहआरोपी करण्यात यावे.दबाव टाकणाऱ्या मंत्र्यांनाही कायद्याच्या कक्षेत आणावे.अनुसूचित जाती आरक्षणाची अखंडता अबाधित ठेवावी.यासाठी सर्व यासाठी सर्व अनुसूचित जाती एस सी प्रवर्गातील जात सुमांनी व त्यातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या मोर्चा यशस्वी करावा.
संविधान संवर्धन चळवळीचे संघटक संग्राम सावंत म्हणाले, आपण एकजुटीने अनुसूचित जातीतील सर्व जातीने एकत्र येऊन आता ही लढाई लढायला लागणार आहे यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊया आणि गडहिंग्लज प्रांत कार्यालयावरचा मोर्चा यशस्वी करूया.
या बैठकीला गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील समितीचे दिगंबर विटेकरी,सुरेश चव्हाण,भिमराव नंदनवाडे,संतोष सुळकुडे, वसंत शेटके,अमर चौगुले, बसवराज कांबळे, भैरू कांबळे,राजू गुडसे, सागर कांबळे, भीमसेन विटेकरी, तुषार कांबळे, गौतम सरनाईक, विलास कांबळे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी व अनुसूचित जाती समाजातील मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
अनुसूचित जाती आरक्षण बचाव समिती, कोल्हापूरची गडहिंग्लज येथे बैठक संपन्न
|