बातम्या

नीट पेपरफुटी आंदोलनावर लाठीचार्ज; दोषींवर कठोर कारवाईची शिवसेनेची  मागणी

Lathi charge during NEET paper leak protest


By nisha patil - 7/23/2026 3:32:08 PM
Share This News:



नीट पेपरफुटी आंदोलनावर लाठीचार्ज; दोषींवर कठोर कारवाईची शिवसेनेची  मागणी

कागल प्रतिनिधी अजित बोडके नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील दोषींना शिक्षा मिळावी आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र निषेध केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे.
 

शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नीट पेपरफुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सोनम वांगचुक यांनी जंतर-मंतर येथे उपोषण सुरू केले होते.
 

मात्र, आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून तोडगा काढण्याऐवजी पोलिसांनी मोर्चावर लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कारवाईत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून काहींना गंभीर दुखापती झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
 

लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर करण्यात आलेली ही कारवाई निषेधार्ह असून विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. लाठीचार्ज प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे.
निवेदनाची प्रत राधानगरी तहसील कार्यालय येथे देण्यात आली.
राधानगरीचे तहसीलदार सौ अनिता देशमुख मॅडम यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.

 

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनिल शिंत्रे,आजरा उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील,विमल पाटील महिला संघटिक जिल्हा प्रमुख, युवराज पाटील आजरा तालुकाप्रमुख, रवि पाटील युवा सेना जिल्हा समन्वयक, सागर पाटील, उत्तम शेटके उपतालुकाप्रमुख, विक्रम पाटील शेतकरी सेना उपजिल्हा प्रमुख,जमीर ताशिलदार, अवधूत पाटील, साताप्पा नरके, महादेव पाटील विभाग प्रमुख, गौरव आवाड,साहिल खोडके शाखा प्रमुख तसेच राधानगरी तालुका शिवसैनिक उपस्थित होते,

 


नीट पेपरफुटी आंदोलनावर लाठीचार्ज; दोषींवर कठोर कारवाईची शिवसेनेची  मागणी
Total Views: 16